spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्याला केंद्राचा पाठींबा आहे, आम्ही काम करून विरोधकांना उत्तर देऊ ; मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मुंबई : गेल्या 39 दिवसांपासून प्रलंबित असलेला राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आज 9 ऑगस्ट 2022 रोजी पार पडला आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी समारंभ पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी 9 अशा एकूण 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावर राष्ट्रवादी व भाजपातील महिला नेत्यांनी निषेद केला आहे. या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्रीचा समावेश नसल्या कारणाने अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी उशिरा का होईना, महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं आहे. अशी भावना व्यक्त केली.

राज्यचे मुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळ विस्तारा नंतर पहिली प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे म्हणाले, “अजून काही नवं बाकी आहेत, जे यांचा राज्यातील मंत्रिमंडळाचा विरोध करत आहेत. त्यांना आम्ही चांगली कामे करून दाखवू व त्यांना उत्तर देऊ असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राचे नवे कॅबिनेट मंत्रिमंडळ

संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे विरोधक संतप्त

महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चीट दिली होती, त्यामुळे त्यांना स्थान देण्यात आलं आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कोणाचं काही म्हणणं असेल तर ते ऐकून घेतलं जाईल असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली.

अजित पवार यांची प्रतिक्रिया

अजित पवार म्हणाले, “मंत्र्यांच्या यादीत काही नावं आणखी टाळता आली असती तर बरं झाले असते असे त्यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, पण उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळाले आहे. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत. ज्यांना क्लीनचीट मिळालेली नाही त्यांची नावं टाळता आली असती तर बरं झाले असले अस, अजित पवार यांनी म्हटले.

राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा

Latest Posts

Don't Miss