शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. हे प्रकरण नंतर निवडणूक आयोगाकडे गेल. यानंतर मागील आठ महिन्यांपासून निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती.
आणि आज या प्रकरणाचा निकाल लागला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. यावेळेस एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की “हा बाळासाहेब आणि आनंद दिघेंच्या विचारांचा विजय आहे”. असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

आज महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठी घटना घडली आहे. आठ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून शिवसेनेमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा केला होता. नंतर हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे नेण्यात आलं. मग निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु होती. आज निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे याना दिले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की “आजचा हा विजय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि लोकशाहीचा आहे. याबरोबरच हा विजय सत्याचा आहे. आम्ही संघर्ष केला, आजचा विजय म्हणजे त्यातंच प्रतिक आहे”. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे म्हणाले की “आजचा विजय म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे. याबरोबरच लाखो शिवसैनिकांचा आहे. आजच्या निर्णयाने आम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झालं आहे. या देशात राज्य घटनेनुसार कायदा चालतो. निवडणूक आयोगाचा निर्णय हा मेरीवर दिलेला निर्णय आहे. विरोधकांच्या टीकेवर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा : 

गिरीश बापट यांच्या भाजप प्रचारासंदर्भात शरद पवार यांच सूचक विधान , त्यांची प्रकृती पाहता….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version