आमच्या सरकारबद्दल लोकांचे मत चांगले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आमच्या सरकारबद्दल लोकांचे मत चांगले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आसाम मधील कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर शिंदे गटातील आमदार आणि खासदार गुवाहाटीवरून मुंबईला रवाना झाले. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKnath shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुलडाण्यातील शेतकरी मेळाव्यातून केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्युत्तर देत सूचक इशारा दिला आहे. शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे हे नैराश्यातून काहीही वक्तव्य करातात. ‘त्यांना अपेक्षेपेक्षा आधिक नैराश्य आले आहे,’ असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘यापूर्वी असलेली महाराष्ट्रातील नकारात्मकता आमचे सरकार आल्यानंतर बदलली आहे. आमच्या सरकारबद्दल लोकांचे मत चांगले आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य त्यांच्याकडून होत आहे,’’ असा दावा शिंदे यांनी केला.

हेही वाचा : 

Margsheesh fasting मार्गशीष उपवासासाठी खास अप्पे, जाणून घ्या रेसिपी

उद्धव ठाकरे यांनी बुलडाण्यातील सभेत शिंदे गटाला उद्देशून खोक्यांचा उल्लेख केला. त्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘‘शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी फ्रिजएवढ्या खोक्यांचा उल्लेख केलाच आहे. हे फ्रीज एवढे खोके कोणाकडे गेले, याचा मी शोध घेणार आहे. आमदारांची खोकी लहान होती. पण कंटेनरमधून आणलेली खोकी कोण पचवू शकतो, हे महाराष्ट्राला माहिती आहे.’’

“मी जे करतो, ते उघडपणे. लपून छपून नाही. काही लोक लपून छपून करतात. पण लपून छपून केलेली कामं उजेडात येतात आणि ती लोकांना माहिती पडतात. दीपक केसरकर यांनी कालच एक वक्तव्य केलेलं आहे. ते टीका करणाऱ्यांनी बोध घेण्यासारखं आहे. आमच्यावर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोक्यांवरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. फ्रीजमध्ये भरून कुठे खोके गेले? आता याचा मी शोध घेतो आणि नंतर त्याच्यावर बोलतो.” असा सूचक इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

Raj Thackeray melava LIVE : कोरोना काळात ठाकरेंनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

मुख्यमंत्री यांचा गुवाहटी दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदार आणि खासदारांसह शनिवारी गुवाहाटी येथील कामाख्या देवीचे दर्शन घेतले. दर्शन, पूजन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही मनापासून भक्तीभावाने कामाख्या देवीची पूजा केली. आम्ही सर्वजण समाधानी होतो. आम्ही सर्व आनंदी आहोत. देवीच्या आशीर्वादाने आसाम आणि महाराष्ट्र यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित झाले आहेत. आसामच्या जनतेला आनंद, आनंद आणि शांती लाभो आणि महाराष्ट्रासमोरील सर्व संकटे दूर होवोत. तसेच शिंदे यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

राज ठाकरेंचा राहुलगांधींवर खरपुस शब्दांत टीका

Exit mobile version