मुख्यमंत्र्यांकडून मोठा फेरबदल, २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या जाणून घ्या कुणाची बदली कुठे?

मुख्यमंत्र्यांकडून मोठा फेरबदल, २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या जाणून घ्या कुणाची बदली कुठे?

राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा बदल्या करण्यात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काल बुधवारी २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील जिल्हाधिकाऱ्यांसह एकूण २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : 

पवारांच्या घरावर हल्ला करणारे ST महामंडळाचे बडतर्फ झालेले कर्मचारी आजपासून पुन्हा सेवेत, सदावर्ते यांच्यासोबत जल्लोष

मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांची वैद्यकीय शिक्षण आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर अस्तिमक कुमार पांडे यांची औरंगाबादत जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी २० अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेशही जारी करण्यात आलाय. याआधी ४४ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे एकूण ६४ अधिकाऱ्यांच्या बदल्या आतापर्यंत शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आल्या आहेत.

Mumbai University Exams : मोठी बातमी ! मुंबई विद्यापीठातील पहिल्या सत्राच्या परीक्षेच्या सुधारित तारखा अखेर जाहीर

कुणा कुणाची बदली?

विरेंद्र सिंह – IAS २००६ – वैद्यकीय शिक्षण, आयुक्तपदावरुन महाराष्ट्र आयटी कॉर्पोरेशचे एमडी म्हणून बदली

मिताली सेठी IAS-२०१७ – डायरेक्टर, वानामती, नागपूर

सुशील चव्हाण IAS-२००७ – औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदावरुन मुंबईत असंघटीत कामगार डेव्हलपमेन्ट कमिशनर म्हणून बदली

अजय गुल्हाने, IAS-२०१० – चंद्रपूर जिल्हाधिकारी पदावरुन आता अतिरीक्त पालिका आयुक्त नागपूर म्हणून बदली

दीपक कुमार मीना IAS-२०१३ – नागपूर पालिकेचे अतिरीक्त आयुक्त पदावरुन अतिरीक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून बदली

विनय गोवडा IAS-२०१५ – सीईओ, जिल्हा परीषद साताराहून आता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली

आर.के. गावडे IAS-२०११– नंदुरबार झेडपी सीईओ पदावरुन आता मुंबई अतिरीक्त निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

माणिक गुरसल IAS-२००९ – अतिरीक्त आयुक्त (उद्योग)

शिवराज श्रीकांत पाटील IAS-२०११ – महानंद मुंबईचे एमडी म्हणून नियुक्ती

अस्तिक कुमार पांडे IAS-२०११ – औरंगाबादचे जिल्हाधिकारी

लीना बनसोड IAS-२०१५ – एमडी, एम.एस को ऑप. ट्रायबल देवे. कॉर्पोरेशन, नाशिक म्हणून नियुक्ती

दीपक सिंगला IAS-२०१२ एमएमआरडीचे जॉईन्ट कमिशन म्हणून मुंबईत नियुक्ती

एस.एस माळी IAS-२००९ – संचालक, ओबीसी बहुजन वेल्फेअर संचालनालय, पुणे म्हणून नियुक्ती

एस.सी. पाटील IAS-९९९९– जॉईन्ट सेक्रेटरी म्हणून मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबईत येथे नियुक्ती

डी.के खिलारी IAS-९९९९ – सातार झेडपी सीईओ म्हणून नियुक्ती

एस.के. सलिमनाथ IAS-२०११ – सिडको, मुंबई येथे जॉईन्ट एमडी म्हणून नियुक्ती

एस.एम.कुर्तकोटी IAS-९९९९ – नंदुरबार झेडपीचे सीईओ म्हणून नियुक्ती

राजीव निवतकर IAS-२०१९-मुंबई जिल्हाधिकारीसह वैद्यकीय शिक्षण संचालक म्हणून नियुक्ती

बी.एच पालवे IAS-९९९९– अतिरीक्त विभागीय आयुक्त नाशिक म्हणून नियुक्ती

आ.एस. चव्हाण IAS-९९९९– जॉईन्ट सेक्रेटरी, रेव्हेन्यू स्टॅम्ट आणि वनविभाग, मंत्रालय मुंबई म्हणून नियुक्ती

राशी भविष्य १३ ऑक्टोंबर २०२२, पवित्र आणि ख-या प्रेमाचा सुखद अनुभव येईल

Exit mobile version