उद्या पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी, शिंदे कोणाची भेट घेणारा?

उद्या पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी, शिंदे कोणाची भेट घेणारा?

राज्यात एकीकडे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर संपूर्ण राजकारण तापलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान शिंदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदेंसोबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि उद्योग मंत्री उदय सामंत हेदेखील दिल्लीला जाणार असल्याची माहित समोर येत आहे. त्यामुळे या दौऱ्यात नेमकी काय खलबतं शिजणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

India vs Australia 1st T20 : उमेश यादवने ‘या’ दोन खेळाडूंचे वाढवले टेन्शन

दिल्ली दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर दोन मंत्री उद्या दुपारी दिल्लीत दाखल होणार असून, या दौऱ्यादरम्यान ते नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे यांची भेट घेणार असलयाचे म्हटले जात आहे. या भेटीदरम्यान राज्यातील अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या तीन मंत्र्याशिवाय संदीपान भूमरेदेखील दिल्लीला जाणार आहेत.

हेही वाचा : 

काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि अशोक गेहलोत यांच्यात चुरस तर, राहुल गांधीच्या अध्यक्षपदावर टांगती तलवार

राज्याच्या विकासासाठी केंद्रातर्फे जी आवश्यक मदत हवी आहे. त्यादृष्टीने चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण नुकताच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर येथून पुढे राज्य सरकार कोणत्याही प्रकारचा प्रकल्प राज्यातून बाहेर जाऊ देण्यास इच्छूक नसल्याचे दिसून येत आहे. राज्यच्या दृष्टीने महत्वाचा असेलेला प्रकल्प गुजरात मध्ये गेल्या प्रकरणी विरोधकांच्या टीकेचे सत्र चालूच आहे.

आमच्या काळात वेदांता-फॉक्सकॉननं राज्यात येण्याचं नाकारलं हे साफ खोटं आहे. त्यांनी अनेक प्रकल्प आणावेत. फक्त पर्यावरणाचा समतोल राखला जावा याची काळजी घ्यावी, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी दिल्लीला जाणार आहेत, असं ऐकलं आहे. दिल्लीत त्यांनी बेरोजगार तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी माझी मागण्या असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

राहुल गांधीच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाला पक्षातीलच नेत्यांचा विरोध

Exit mobile version