spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आयोध्या दौरा लवकर

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीला मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेद लागले आहेत. सतत हिंदुत्वासाठी आम्ही लढत आहोत. असे म्हणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला होता. अयोध्येतील नागरिकांनी आदित्य ठाकरेंचं मोठ्या उत्साहात स्वागत केले होले. आता हाच हिंदुत्वाचा मुद्दे अधिक ठळकपणे दर्शवण्यासाठी एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा करणार असल्याचे अद्याप अधिकृत रित्या जाहीर केलेले नाही. मध्य प्रदेश सरकार कडून मुख्यमंत्र्यांना निमंत्रण आले आहे. त्यामुळे अयोध्येत रामाचे दर्शन घेण्यासाठी पाठवलेल्या या निमंत्रणाचा स्वीकार एकनाथ शिंदे करणार असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी आदित्य ठाकरेंनीही 15 जून रोजी अयोध्येत श्रीरामांच्या मंदिराला भेट दिली होती. आदित्य ठाकरेंच्या या दौर्यात एकनाथ शिंदेचा देखील सहभाग होता. अयोध्या आणि शिवसेनेचे जूने नाते असल्याचे शिवसैनिकांकरून वारंवार सांगितले जाते. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं राजकारण हिंदुत्वापासून दूर जात असल्याची टीका होऊ लागली. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी या दौऱ्याचं आयोजन केलं होतं. आता शिवसेनेतून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट याचसाठी अयोध्येत जाणार असल्याची चर्चा आहे.

शिंदेच्या दौर्यावर संजय राउतांची प्रतिक्रिया

“शिंदे हे आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत चांगली गोष्ट आहे. त्यांचा सर्व प्रथम दौरा हा आमच्या सोबत झाला होतो. शिंदेनी तिथे पूजा आरचा केली माझ्या समोर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनच्या मजबुतीसाठी माझ्या सामोर प्रार्थना केली आहे. पण त्या नंतर काय झाले ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण ठीक आहे. आयोधेला जा, वाराणसीला जा, काशीला जा, पण आमच्या शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मशाल हि कायम तेजाने तळपत राहील” असे संजय राउत म्हणाले.

हेही वाचा : 

विजय देवरकोंडाने वापरली नवी शिक्कल, LIGER सिनेमाच्या ट्रेलर लाँच वेळेस सगळ्यांना आश्चर्याचा धक्का.

Latest Posts

Don't Miss