spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ विस्ताराविषयी पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्याबाबत माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत याबद्दल माहिती दिली.

मुंबई – रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या स्नेह भोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री शुक्रवारी दिल्लीत उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी दिल्ली दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराविषयी आणि खातेवाटपाबाबतही चर्चा होण्याची शक्यता होती. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौऱ्याबाबत माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत याबद्दल माहिती दिली. Chief Minister Eknath Shinde’s first reaction after Delhi visit

हेही वाचा

माझ्याही वडिलांना मारण्याची सुपारी दिली होती, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर गभीर आरोप

 

दिल्ली दौऱ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की ‘अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल’. राज्य सरकारचं अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा शिंदे सरकारचा विचार आहे, त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. पुढे ते म्हणाले, की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मी भेट घेतली. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट झाली. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा

बंडखोर आमदारांची तिरडी उठणार अशा कडक शब्दात संजय राऊत यांची टीका

त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था न देण्याची सूचना दिली होती. असा दावा सुहास कांदे यांनी केला. यावर मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटले, माझी सुरक्षा नाकारण्यासंदर्भात तत्कालीन गृहराज्यमंत्री उत्तर देऊ शकतात. तेव्हा मी गडचिरोलीचा पालकमंत्री होतो. तेव्हापासून अनेक नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर मी आहे. पण अशा धमक्यांना मी तेव्हा ही भीक घातली आणि आता ही घालणार नाही. अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्र्यांनी दिली.

Latest Posts

Don't Miss