Tuesday, October 1, 2024

Latest Posts

नाव मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर बदनामी करण्याचा काम सुरू ठेवा. आम्ही जनतेच्या हिताचे काम करून राज्याला पुढे नेणार,असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावला आहे.

एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा विजय असल्याचं म्हटलंय. शिवाय आम्हीच विचारांचे वारसदार, असे ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे.

बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यामुळे सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना शुभेच्छा देतो एक चांगली सुरुवात झाली आहे असे म्हणत पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. निवडणूक आयोगाला देखील मी धन्यवाद देतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने चिन्ह अमान्य केल्यानंतर आता त्यांचं पुढचं पाऊल काय असेल असं विचारलं असता त्यांनी, चिन्हं जी आहेत उदय दिली जातील. आम्ही दिलेली चिन्ह त्यांनी रद्द केली असली तरी. उद्या सकाळी चिन्ह दिली जातील आणि त्यातलाच एक चिन्ह आम्हाला मिळेल.

माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मिळालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल या चिन्हाबद्दलसुद्धा प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे म्हणाले,
त्यांना मिळालेलं चिन्ह आणि नाव याबाबतीत त्यांचं विचारा. मशाली ह्या अन्यायाविरुद्धा पेटल्या पाहिजेत. शिवाजीमहाराजांच्या काळात देखील अन्यायाविरुद्धा मशाली पेटवल्या गेल्या होत्या, आपण सर्वांनी त्या पहिली होत्या.त्यामुळे आम्ही अन्याय दूर करणारा पक्ष आहे. ह्या राज्याचा सर्वसामान्यांचा, जनतेचा पक्ष आहे. सरकार आहे. त्यामुळे या सरकारमध्ये सर्वसामान्यांचा जनतेच्या आणि त्यांच्या जीवनामध्ये काय बदल घडू शकतो हे आम्ही पाहणार आहोत. यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकरी, बळीराजा, महीलाभगिनी असतील या सर्व घटकांच्या जीवनात बदल कसा घडेल हे सर्व हे सरकार पाहणार आहे.

धनुष्यबाणाबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, यापूर्वी जर निवडणूक आयोगाने मेरिटवर घेतलेले निर्णय पाहिले तर, ज्या पक्षाकडे बहुमत असतं त्यांना चिन्ह मिळतं आणि आमच्याकडे ७०% बहुमत विधानसभा आणि लोकसभेत आमच्याकडे आहे. ७०% जास्त मतं आमच्याकडे आहेत. त्याचबरोबर हजारो – शेकडो लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पंचायतसमिती सदस्य, जिल्हास्तरीय प्रतिनिधी, कार्यकर्ते आमच्याकडे आहेत. किंबहुना देशातील १४ राज्यप्रमुखांनी आम्हाला समर्थन आणि इतकं समर्थन, बहुमत आमच्याकडे असताना आम्हाला धनुष्यबाण आम्हाला मिळालं नाही हा आमच्यावरचा अन्याय आहे. त्यामुळे याआधी ज्या मेरिटवर निवडणूक आयोगाने निर्णय घेतले ते यापुढे आमच्या बाजूने लावले पाहिजेत असे आमचे प्रयत्न चालू आहेत.

आम्ही आमचा काम करतोय. प्रत्येक टीकेला टीकेने उत्तर द्यायची गरज नाही. त्यासाठी आमचे नेते, कार्यकर्ते सक्षम आहेत. उलट्या काळजाचे कोण, विश्र्वासघातकी कोण हे जनतेने २०१९ लाच पाहिलंय. नीती धर्म जो असतो त्याचा त्याग कुणीतरी २०१९ मध्येच केलाय. त्यामुळे आम्हाला उलट्या काळजाचे म्हणण्याआधी स्वतःच्या गिरेबानमध्ये झाकून बघा ,आत्मपरीक्षण करा. जनता सुज्ञ आहे. सोशल मीडियावर बदनामी करण्याचा काम सुरू ठेवा. आम्ही जनतेच्या हिताचे काम करून राज्याला पुढे नेणार,असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावला आहे.

शिवसेना भाजप युती निवडणूक लढणार आणि जिंकणार.आम्ही शिवसेनेचे, बाळासाहेबांचे आणि त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते आहोत. म्हणूनच लोक जमा होतात. इतकी गर्दी होते. बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे आणि समाधानी आहोत, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी त्यांना मिळालेल्या बाळासाहेबांची शिवसेना या नावावर दिली आहे.

हे ही वाचा:

निवडणूक आयोगाने का नाकारले दोन्ही गटांना हवे असणारे उगवत्या सूर्याचे चिन्ह, मोठं कारण आलं समोर

याआधीसुद्धा शिवसेनेकडे होते मशाल हे चिन्ह; असा आहे इतिहास…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss