spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“पन्नास खोके एकदम ओक, आले रे आले गद्दार आले” राज्यसरकार विरुद्ध विरोधकांची घोषणा बाजी

आजपासून महाराष्ट्र राज्यात विधीमंडळाचे पावसाळी अधिवेश सुरु होणार आहे. हे पावसाळी अधिवेश वादळी अधिवेशन होणार असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्या नंतर विरोधकांकडून आक्रमक भूमिका कायम पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनासाठी विधिमंडळात दाखल झाले आहेत. त्याचसोबत विरोधी पक्षनेतेही दाखल झाले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्यच दिवशी महाविकास आघाडी सरकारचे नेते विधानभवना बाहेर राज्यसरकार विरुद्ध आंदोलन करत आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर बसणारं भाजपा आता सत्ताधारी बाकावर बसलेलं पाहायला मिळेल. तर शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट आमनेसामने येणार आहेत. या अधिवेशनात युवेसेना नेते आदित्य ठाकरे हे हजेरी लावणार नसल्याची चर्चा होत होती, परंतु विधानभवना बाहेर चालू असलेल्या या आंदोलनात आदित्य ठाकरे देखील सहभागी आहेत.

राज्यसरकारचा मोठा निर्णय, ” गोविंदा पथकाला 10 लाखांचं विमा संरक्षण तर, महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ”

गेल्या अनेक दिवसात मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधक टीका-टिपणी करत होते. त्यानंतर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मग खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली गेली. याचीच पुनरावृत्ती या अधिवेशनात पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, मुंबईतील मेट्रो कारशेडचा वाद, ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, यासह वादग्रस्त मुद्द्यांवरून घमासान पाहायला मिळणार आहे. त्याचे प्रमाणे ईडी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा केल्या जात आहे. “पन्नास खोके एकदम ओक” असे म्हणत शिंदे गटाला हिणवले जात आहे. अधिवेशनात सत्तेत असलेली महाविकास आघाडी आता विरोधी बाकावर दिसणार आहे. मंत्र्यांनी नुकताच शपथ घेतली आणि नुकतेच खातं वाटप झालेलं आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणार असल्याचं चित्र दिसणार आहे.

हेही वाचा : 

मोहित कंबोज यांच्या सूचक ट्वीटवर, राष्ट्रवादीचे सडेतोड उत्तर

Latest Posts

Don't Miss