spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Nagpur मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रेशीमबागेत दिली भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी आज नागपुरातील (Nagpur) राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार (Dr K B Hedgewar) यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रांसह सकाळी साडेदहाच्या सुमारास रेशीमबाग (Reshimbag) इथल्या डॉ. हेडगेवार स्मृतीभवन इथे दाखल झाले आणि त्यांना आदरांजली वाहिली. तसंच आरएसएसचे दुसरे संघचालक माधवराव गोलवलकर यांच्या स्मृतिंनाही एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं.

हेही वाचा : 

‘उध्दवजी,एकांतात दिलेला शब्द पाळत नाही…’ ट्विट द्वारे शीतल म्हात्रेचा ठाकरेंवर निशाणा, पहा काय म्हणाल्या

याबाबत खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आपल्या ट्विटमध्ये म्हटले, “रेशीमबागेत जाऊन आलात आनंद आहे! या वास्तू सोबत लाखो स्वयंसेवक वर्षानुवर्षे एकनिष्ठ आहेत. त्यांनी कधीही संघ किंवा मुख्यालय हडप करण्याचा नीच प्रयत्न केला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघटनेप्रती निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते.”

मुख्यमंत्र्यांनीही येथील भेटीनंतर बोलताना माध्यमांना ही माहिती दिली. आज मी संघाचे मुख्य कार्यालयाला भेट दिली, तसेच हेडगेवार स्मृतीस्थळालाही भेट दिली. येथे भेट दिल्यानंतर खूप छान वाटलं, एक वेगळीच उर्जा याठिकाणी मिळते.मी लहान असताना संघाच्या शाखेत आलेलो. त्यामुळे, यात काही राजकिय हेतू नाही. आम्ही दोघं एकत्र आहोत, राजकारणात शिवसेना-भाजप युती आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेशीमबागेतील आपल्या भेटीनंतर दिले.

Niagara Falls पूर्ण गोठला, हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

दरम्यान रेशीमबाग (Reshimbag) इथून निघाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दीक्षाभूमीला (Diksha Bhoomi) भेट दिली. इथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं दर्शन घेऊन हार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी अस्थिकलशाचं दर्शन घेतलं. यानंतर ते थेट अधिवेशनासाठी विधानभवनाला रवाना झाले.

Latest Posts

Don't Miss