spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री शिंदे यांना मिळेनासे झालंय पोटभर जेवण-औषधं

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या नेत्याच्या हाती अमर्याद अधिकार असतात. सुरक्षा रक्षकांचे डोळ्यात तेल घातलेलं कडं असतं. राज्यभरातील सर्वच स्तरातील नागरिक आपल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पहात असतात.

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या नेत्याच्या हाती अमर्याद अधिकार असतात. सुरक्षा रक्षकांचे डोळ्यात तेल घातलेलं कडं असतं. राज्यभरातील सर्वच स्तरातील नागरिक आपल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पहात असतात. मात्र याच मुख्यमंत्र्यांना पोटभर जेवण आणि वेळच्या वेळी औषधपाणी मिळत नसेल तर… ? होय, हे अगदी खरं आहे . त्यामुळेच ही गोष्ट अवघ्या दीड महिन्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीसाठी आणि सुरक्षेसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झाले आहेत. सत्तांतरासाठी त्यांनी ज्या ४० सेनेच्या आणि १० अपक्ष आमदारांची साथ मिळवली .त्यामुळेच पक्षप्रमुख असूनही उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त् म्हणूनच या ५० आमदारांना दुखावू नये यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा सतत प्रयत्न असतो. त्याचवेळी यातील बहुतेक आमदारांचा विचित्र पध्दतीने शिंदेंना गराडा असतो. या आमदारांबरोबर येणारे कार्यकर्ते फोटो काढण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी तसेच विकास कामांसाठी, आमदारांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रचंड गर्दी करत आहेत. ही गर्दी इतकी भयंकर असते की मुख्यमंत्री शिंदे यांचा समिती कक्ष, मुख्यमंत्र्यांचं दालन, स्वीय सचिव दालन, मुख्यमंत्र्यांचा नंदनवन बंगला, ठाण्यातला लुईस वाडी इथला बंगला, इतकंच काय पण मुख्यमंत्र्यांच्या गाडीत जिथे तिथे फक्त गर्दीचं गर्दी असते. मुख्यमंत्री शिंदे सभागृहात बसलेले असतानाही त्यांच्या गटातील आमदार आक्षेपार्ह पध्दतीने त्यांच्या आसपास वावरत असतात. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनीडनाराजी व्यक्त केलीय.

मी जनतेचा मुख्यमंत्री आहे असं शिंदे म्हणत असल्याने त्यांचे खाजगी सचिव, विशेष कार्य अधिकारी, सुरक्षा अधिकारी यांनीही नागरिकांना रोखू नये असं त्यांना सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्यंमत्री शिंदेच्या अगदी खुर्चीच्या आजूबाजूला खेटूनही आमदार आणि त्यांचे समर्थक उभे असतात. मंगळवारी दुपारचे जेवण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना गर्दी मुळे संध्याकाळ झाली. ते ॲण्टिचेंबर मध्ये जेवायला बसून चपातीचा घास तोंडात घालतात ना घालता तोच एकापाठोपाठ एक असे ८/१० आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते घुसून आत आले. प्रचंड गर्दी झाली हे बघून मुख्यमंत्र्यांना जेवण अर्धवट सोडून द्यावं लागलं. गेल्या काही दिवसांत हा प्रकार अनेकदा झालाय.

मंगळवारी मुख्यमंत्री शिंदेना वायरल ताप होता. ते गोळ्या घेऊन काम करत होते. रात्री त्यांना अधिक ताप येताच त्यांच्या निवासस्थानी डॅाक्टरांना पाचारण करण्यात आले. या डॅाक्टरांनी दोन इंजेक्शन्स देऊन त्यांना आराम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांनंतर डॅाक्टरांना घरी नेऊन सोडण्यात आले. मात्र शिंदेना फार आराम न करताच अधिवेशन गाठावे. मुख्यमंत्री शिंदे कोणालाच टाळत नसल्याने आणि उध्दव ठाकरेंनी कुणालाच भेटी दिल्या नसल्याने विधानभवनात जिकडे तिकडे सध्या अभ्यागत दिसतायत. यातल्या काही आमदारांनी शिंदे बरोबरची आपली जवळीक दाखवताना मुख्यमंत्र्यांच्या राजशिष्टाचाराचे तीन तेरा वाजवले आहेत. मुख्यमंत्र्यांसह कोण फोटो काढतात याबाबत कुणाचाच अंकुश नाही. याबाबत शिंदे गटाने नेते आणि औरंगबादचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी आणि उत्साही मंडळींनी आता मुख्यमंत्र्यांना काम करू द्यायला हवे. पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू असले तरी मुख्यमंत्र्यांच्या जेवण , औषधे आणि सुरक्षेची हयगय व्हायला नको.’ ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाटक म्हणाले , मुख्यमंत्र्याच्या भवतालच्या गोंधळालै खाजगी सचिव आणि सुरक्षा रक्षक याही पेक्षा मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. लोकांचे प्रेम असले तरी ते स्विकारताना मुख्यमंत्र्यांना वेळेच भान ठेवावे लागेल. नाहीतर सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. यावर स्वतः शिंदेंना कठोर होताना यासाठी स्व.विलासराव देशमुखांचा आदर्श ठेवावा लागेल.

पक्ष सचिव किरण पावसकर यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढून मुख्यमंत्री शिंदेंची काळजी घेण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू असा विश्वास बोलून दाखवलाय.

 

हे ही वाचा:

स्वाइन फ्लू: अचानक फ्लूच्या घटनांमागील कारणे काय आहेत आणि ते कसे टाळता येईल

महाराष्ट्र पुन्हा अलर्टवर! मुंबई – पुण्यात घातपाताची शक्यता

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss