मुख्यमंत्री शिंदे आ. संतोष बांगर यांच्या कावड यात्रेत सहभागी होणार, हिंगोलीत शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन

मुख्यमंत्री शिंदे आ. संतोष बांगर यांच्या कावड यात्रेत सहभागी होणार, हिंगोलीत शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन

हिंगोलीत शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन

हिंगोली : राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्या दरम्यान असताना शिंदे गटातील आमदारांच्या मतदार संघात जाऊन सभांना उपस्थिती दाखवत आहेत. आज मुख्यमंत्री शिंदे हे आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांच्या हिंगोली मतदारसंघात जाऊन नागरिकांची भेट घेणार आहेत. व मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत काही कार्यक्रम होणार आहेत. विशेष म्हणजे आमदार बांगर यांच्या सावरखेडा येथील फार्महाऊसचे उद्धाटन देखील मुख्यमंत्री करणार आहेत. तत्पुर्वी बांगर यांच्याच कळमनुरी येथील बंगल्यात देखील शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. या शिवाय गेल्या 7 वर्षापासून आमदार बांगर यांच्याकडून कळमनुरी ते औढानागनाथ दरम्यान काढण्यात येणाऱ्या कावड यात्रेत देखील मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.

आमदार संतोष बांगर यांच्या बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत नव्याने संघटना बांधू असे आश्वासन दिले. त्यानंतर मी लवकरच हिंगोलीत येईन, असा विश्वास दिला होता. तसेच बांगर यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी देखील केली होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक समर्थक आमदरांना बळ देण्याचे धोरण ठेवत त्यांच्यासाठी दौरे सुरू केले आहेत. दरम्यान, या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती बांगर यांनी दिली. एकंदरित मुख्यमंत्र्यांचा हिंगोली दौरा हा पुर्णपणे बांगर यांच्यासाठीच असल्याचे कार्यक्रमाच्या नियोजनावरून स्पष्ट होते.

हेही वाचा : 

संजय राऊतांनी कोठडीतून लेख कसा लिहिला ? ईडी करणार आता रोखठोक चौकशी

Exit mobile version