spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यपालांच्या विधानाबाबत मुख्यमंत्री शिंदे केंद्र सरकारला पत्र लिहणार

मुंबई : मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराती समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात केला. त्यानंतर मनसेसह शिवसेनेकडून यांच्यावर टीका केली जात आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यासंदर्भात केंद्र सरकारकडे तक्रार करतील, अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली.

दीपक केसरकर म्हणाले की, एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर त्यांच्याबद्दल चांगले बोलायचे असते. परंतु त्यांनी पैसा काढून घेतला तर मुंबईत काही शिल्लक राहणार नाही असे भाष्य करने म्हणजे मुंबईचा अभ्यास राज्यपालांना नसावा. देशभरात एकूण 40 टक्के कर मुंबईतून दिला जातो. हे सर्वांच्या सहकार्याने शक्य झाले आहे. मुंबईने सर्वांना आश्रय दिला. कुणीही बाहेरून गुंतवणूक घेऊन इठे आले नाही. असे केसरकर यांनी म्हटले.

हेही वाचा : 

“50 खोकेवाले कुठे लपून बसले?” कोश्यारींच्या वक्तव्यावरून राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

“केंद्र शासनाला कळवू की ज्यांची नियुक्ती राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून केली. त्यांनी राज्याप्रती भावना जपल्या पाहिजेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्रदौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा पूर्ण झाला कि आम्ही सगळे आमदार त्यांना भेटू, ते या मुद्द्यावर संवेदनशील असतात. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांच्याबाबत केंद्र शासनाला लिहिण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. असेही दीपक केसरकरांनी सांगितले.

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरातून संतापाची लाट

Latest Posts

Don't Miss