spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘ढाल-तलवार’ निशाणी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आम्हाला ढाल तलवार त्यांनी दिली आहे आणि त्यांचा निकाल आम्हाला मान्य आहे. ढाल-तलवार ही शिवसेनेची जुनीच निशाणी आहे. आपली बाळासाहेबांची शिवसेना आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद सुरु होते. सुरुवातील एकनाथ शिंदे बंड करून शिवसेनेमधून बाहेर पडले. त्यानंतर दसरा मेळाव्यावरून वाद झाले आणि अंधेरी पोट निवडणूकच्या पार्शवभूमीवर शिवसेना हे नाव धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले होते. आणि शिवसेना नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह आणि नाव मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगाने काल याबद्दलचा निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर ‘मशाल’ हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. शिंदे गटाला चिन्ह हे मिळाले नव्हते. परंतु अखेर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला जो निर्णय आहे. तो आम्हाला मान्य आहे. आम्ही प्राधान्य तळपता सूर्य चिन्हाला दिलं होतं, परंतु त्यांनी आम्हाला ते चिन्ह दिलं नाही. आम्हाला ढाल तलवार त्यांनी दिली आहे आणि त्यांचा निकाल आम्हाला मान्य आहे. ढाल-तलवार ही शिवसेनेची जुनीच निशाणी आहे. आपली बाळासाहेबांची शिवसेना आहे. ही मराठमोळी निशाणी आहे. त्यामुळे आता परफेक्ट काम झालेलं आहे. ढाल-तलावर ही छत्रपती शिवरायांची आणि त्यांच्या मावळ्यांची निशाणी आहे, त्यामुळे ती अगोदच सर्वत्र पोहचलेली आहे.”

यापूर्वी शिंदे गटाकडून आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. मात्र, ती चिन्हं देण्यास आयोगान नकार दिला. त्यानंतर आज सकाळी शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड या तीन चिन्हांचा पर्याय ठेवला होता. तसेच शिंदे गटाकडून ‘तळपता सूर्य’ या चिन्हाला प्राधान्य असल्याचे सांगितले जात होते. मात्र, निवडणूक आयोगाने शिंदेगटाला ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक चिन्ह म्हणून दिले आहे. त्यामुळे आता येत्या काळात मशाल विरुद्ध ढाल हा ठाकरे आणि शिंदे गटातील सामना नक्की कसा रंगतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

Eknath shinde : अखेर निवडणूक आयोगाचा निर्णय समोर, शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह आता मशाल विरुद्ध ढाल तलवार

म्यानात तर एकच तलवार असते मग यांच्याकडे दोन कशा, शिंदे गटाच्या चिन्हावर सुष्मा अंधारेंची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss