“राज्याला भरगोस निधी मिळणार”, निति आयोच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचं विधान

“राज्याला भरगोस निधी मिळणार”, निति आयोच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचं विधान

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल रविवारी दिल्लीत नीति आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या बैठकीला हजर राहिले होते. या बैठकीत महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीबाबत चर्चा झाली असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले, याबाबत अधिक माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीवरून महाराष्ट्रात परतले. त्यांनी या बैठकीत राज्याच्या हिता कोणते निर्णय घेण्यात आले. याबद्दल माध्यमांना माहिती दिली. महाराष्ट्राला केंद्राकडून भरघोस निधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : 

Maharashtra Cabinet Expansion : आज मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिक्कामोर्तब

Exit mobile version