spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Aadity Thackeray Live मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर माझ्याशी चर्चा करावी, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज

गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही शिवसेना भवनमधून अनेक प्रश्नांवर बोलत आलो आहोत. आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला शेमडी पोरं असं म्हणलं जातं पण कुठे हि माफी न मागता कारभार जसा चालवायचा आहे

गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही शिवसेना भवनमधून अनेक प्रश्नांवर बोलत आलो आहोत. आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला शेमडी पोरं असं म्हणलं जातं पण कुठे हि माफी न मागता कारभार जसा चालवायचा आहे तसा न चावलता मज्जा मस्ती सध्या महाराष्ट्रामध्ये सुरु आहे. बी एम सी (BMC) मध्ये तर टाईमपास टेंडर आणि ट्रान्सफर सुरु आहे. अजून शेती नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे नुकसान भरपाई पोहचण्याचा प्रश्नच नाही. यांचे नेते पोलीस स्टेशनच्या आवारात गोळ्या झाडतात. पण त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. असा आरोप शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Yuva Sena chief Aditya Thackeray) यांनी केला आहे.

महाराष्ट्रापेक्षा कमी विकसित राज्यात वेदांत प्रकल्प (Vedanta Project) गेला असून अशा राज्यांमध्ये या प्रकल्पांनाही अडचणींचा सामना करावा लागतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले. “मी वेदांत फॉक्सकॉनची माहिती तुम्हाला देत होतो. मला ट्विटरवरून कळलं की वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये (Gujarat) गेला. ते कुठल्याही राज्यात जावं. त्याचं दु:ख नाही. पण जो प्रकल्प आपल्याकडे येणार होता, तो ऐनवेळा बाजूच्या राज्यात जातो, तेव्हा त्या उद्योगालाही त्रास होतो. २-३ वर्षांत सुरू होऊ शकणाऱ्या प्रकल्पाला ६-७ वर्षं लागतात”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

शिंदे सरकारने एमओयू (MOU) करण्यासाठी वेदांत फॉक्सकॉनच्या चेअरमनना लिहिलेलं पत्रच यावेळी आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सादर केलं.”आम्ही याबाबत आरटीआय टाकली होती. दीड महिन्यानं आम्हाला उत्तर आलं. हा प्रकल्प १००० टक्के महाराष्ट्रात येणारच होता. याचा पुरावा मी आणला आहे. जर हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्याच काळात गुजरातला गेला असेल, तर या स्तरापर्यंत कसा पोहोचला?” असा प्रश्न करत आदित्य ठाकरेंनी इंग्रजीत (English) लिहिलेलं ते पत्र वाचून दाखवलं.

तसेच आज आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर अनेक आरोप केले. ते म्हणाले की, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प एकनाथ शिंदे यांच्या सरकारमुळेच गुजरातला गेला. एकनाथ शिंदें हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यांना उद्योग गुजरातमध्ये गेले, त्यावरून काही बोलायचंच नाही. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीचा संदर्भ देत शिंदे यांच्यावर आरोप केलेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये गेलेत. या विषयावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माध्यमांसमोर माझ्याशी १० मिनीटं चर्चा करावी, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं. मुळात मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाबाबत माहित होतं का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माहिती अधिकारात मिळालेलं पत्र वाचून दाखवलं. दरम्यान आम्ही ब्लेम गेम करत नसून तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. जी गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती, ती दुसरीकडे पाठवण्यात आली, याचा पुरावा मिळाल्याचं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.

हे ही वाचा : 

अभ्यास करून ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा तयार केला, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Vikram Gokhale दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांच्या ‘या’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss