आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात मुख्यमंत्र्यांनी घेतले बाप्पाचे दर्शन

गेल्या दहा दिवसापासून मुंबईसह संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात उत्साह आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात मुख्यमंत्र्यांनी घेतले बाप्पाचे दर्शन

गेल्या दहा दिवसापासून मुंबईसह संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात उत्साह आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सरकारनं देखील सगळे निर्बंध हटवले आहेत. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या मतदारसंघातील वरळीच्या पोलीस वसाहतीमधील गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं.

वरळीच्या पोलीस वसाहतीमधील गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी ते म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी गणेशभक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. तसेच पोलिसांना ५० लाखांचे घर १५ लाखात देण्याचा निर्णय आमच्या सराकरनं घेतला आहे. परवडेल अशा किंमतीत घर मिळायला पाहिजे अशी मागणी केली जात होती. त्यामुळं सरकारनं पोलिसांठी हा निर्णय घेतला आहे.

तसेच यावेळी त्यांनी पोलिसांना परवडेल अशा किंमतीत घर देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचा आनंद असल्याचे सांगितले. पोलीस हे कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करतो, उन्हा, तान्हात, सणवार, कुटुंबापासून दूर राहतो. त्यामुळं पोलिसांना १५ लाखात घर देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याचे समाधान मला आणि या भागातील नागरिकांना देखील असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुष्पवृष्टी करुन त्यांचे स्वागत करण्यात आलं. यावेळी गणेशभक्तांमध्ये मोठं उत्साहाचा वातावरण पाहायला मिळालं.

आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन सर्वांचा लाडका गणपती बाप्पा भक्तांचा निरोप घेणार आहे. मुंबईमध्ये बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचं आज विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध गणेश मंडळांना भेटी देऊन बाप्पाचं दर्शन घेत आहेत. तसेच गणेश भक्तांनी शुभेच्छा देत आहेत.

मुंबईमध्ये बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचं आज विसर्जन होणार आहे. लालबाग, परळमधील मोठी गणेश मंडळ असणाऱ्या भागात आज वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये आज विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळणार आहे. दोन वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर झाल्यानंतर यंदा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे.

 

हे ही वाचा :

चिंचपोकळी चिंतामणीच्या विसर्जन मिरवणूकीला सुरुवात

लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला… ! दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version