मुख्यमंत्री हे फिरतात पण आणि सरकार पण उत्तम चालवतात, चंद्रकांत पाटीलांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

सुप्रिया ताई तुम्ही काळजी करू नका, सध्याचे मुख्यमंत्री हे फिरतात पण आणि सरकार पण उत्तम चालवतात,

मुख्यमंत्री हे फिरतात पण आणि सरकार पण उत्तम चालवतात, चंद्रकांत पाटीलांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यापासून विरोधी पक्षांचे सत्ताधारी पक्षांवर आणि सत्ताधारी पक्षांचे विरोधी पक्षांवर टीकासत्र हे चालूच असते. महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांकडून रोज एकमेकांवर काहीनाकाही खोचक टीका या केल्या जात असतात. यातीलच एक टीका म्हणजे सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) एकनाथ शिंदेंवर केलेली, “राज्यााला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची (CM) गरज आहे.” ही टीका आणि आता या टीकेला प्रत्युत्तर म्ह्णून “सुप्रियाताई तुम्ही काळजी करू नका आणि सध्याचे मुख्यमंत्री हे फिरतात पण आणि सरकार पण उत्तम चालवतात”, असा टोमणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.

चंद्रकांत पाटील हे टिटवाळा येथील गोवेली महाविद्यालयात आयोजित कल्याण ग्रामीण परिसरातील कीर्तनकार महाराजांचा जाहीर सत्कार सोहळ्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते. सध्या अतिशय उत्तमरीत्या प्रशासन सुरू आहे. आधीचे मुख्यमंत्री हे तर घराच्या बाहेर देखील पडत नव्हते. त्यामुळे सुप्रिया ताई तुम्ही काळजी करू नका, सध्याचे मुख्यमंत्री हे फिरतात पण आणि सरकार पण उत्तम चालवतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. दुर्गम भागात स्किल डेव्हलपमेंट वाढवा ,कौशल्य विकासाशिवाय महाराष्ट्रातल्या तरुण-तरुणींच्या हाताला रोजगार मिळणार असे देखील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे, एक मुख्यमंत्री जे मंत्रालयात बसून काम करू शकतील आणि दुसरे मुख्यमंत्री जे वेगवेगळ्या पद्धतीने फोटोसेशन आणि गणपती दर्शन करत बसतील, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश दर्शन दर्शन करत अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. दहा दिवसात 1200 ते 1500 गणपतींचे दर्शन घेतले. कुणाच्याही टीकांना न जुमानता त्यांनी आपली हि दर्शन यात्रा सुरूच ठेवली आणि याच मुद्याला धरून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ही टीका केली होती.

हे ही वाचा:

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या आधी सचिन तेंडुलकरचे झाले कानपूरमध्ये जबरदस्त स्वागत

शेतकऱ्यांनी सरकारवर फारसं अवलंबून राहू नये, गडकरींनी दिला शेतकऱ्यांना सल्ला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version