Sunday, July 7, 2024

Latest Posts

मुख्यमंत्र्यांचा ठाण्यात होणार सत्कार; निवासस्थानापासून निघणार मिरवणूक

या कार्यक्रमाचे स्वरूप मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकट मुलाखत, गौरवग्रंथाचे प्रकाशन, गौरवगीताचे सादरीकरण अशा प्रकारे असणार आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ठाण्यात सत्कार होणार आहे. मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळाल्यामुळे आज ठाण्यातील विविध सेवाभावी संस्थांकडून हा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमापूर्वी शिंदे यांच्या नितीन कंपनी येथील निवासस्थानापासून कार्यक्रमस्थळापर्यंत त्यांच्या मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले आहे.

हा सत्कार सोहळा ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमात ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील दीडशेहून अधिक संस्थांच्या पुढाकाराने शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा सत्कार  सोहळा खरतर 30 जुलै करण्याचे योजले होते. परंतु मुख्यमंत्र्यांच्या कार्यवेळापत्रकात अचानक अपरिहार्य बदल झाल्याने या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोहळ्यास उपस्थित राहणे शक्य झाले नसते. यामुळे जनगौरव सोहळ्याच्या नियोजित तारखेत बदल करण्याचा निर्णय जनगौरव समितीने घेतला.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, त्र्यंबकेश्वरच्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश अण्णासाहेब मोरे आणि कोल्हापूरच्या कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी उपस्थित राहणार आहेत. तसेच ह्या सोहळ्यात शिंदे गटातील मंत्री उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण देखील उपस्थित राहणार असून त्यांचाही ह्या सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे स्वरूप मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकट मुलाखत, गौरवग्रंथाचे प्रकाशन, गौरवगीताचे सादरीकरण अशा प्रकारे असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकट मुलाखत प्रसिद्ध माध्यमतज्ज्ञ उदय निरगुडकर हे घेणार असल्याची माहिती जनगौरव समितीने सोमवारी झालेल्या बैठकीत दिली.तसेच याबकार्यक्रमापूर्वी शिंदे यांच्या नितीन कंपनी येथील निवासस्थानापासून कार्यक्रमस्थळापर्यंत त्यांच्या मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळापत्रकात बदल झाल्यामुळे ३० जुलै रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाच्या तारखेत बदल करावा लागला आणि आता हा कार्यक्रम १३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. तयम्रले या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ मिळाला आहार. ठाण्यातील अनेक क्षेत्रांमधील संस्था आयोजन समितीत दररोज जोडल्या जात आहेत. हा सत्कार सोहळा ठाण्याच्या आजवरच्या परंपरेला साजेसा असाच ऐतिहासिक ठरावा या दृष्टीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे आणि या सोहळ्याकरिता ठाण्यातील सर्व नागरिक अगदी उस्फुर्त प्रतिसाद देतील असा ठाम विश्वास मला आहे, असं प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री जनगौरव समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी सांगितले.

हे ही वाचा:

समीर वानखेडे जन्मतः मुस्लीम नाही, समितीचा निकाला

Latest Posts

Don't Miss