चंद्रकांत पाटलांच्या सांत्वनासाठी मुख्यमंत्री कोल्हापुरात हजर राहणार

चंद्रकांत पाटलांच्या सांत्वनासाठी मुख्यमंत्री कोल्हापुरात हजर राहणार

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे काल रविवार 24 जुलै रोजी कोल्हापुरात वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांची भेट घेत त्यांचे सांत्वन करणार आहेत. दुपारी 4 च्या सुमारास मुख्यमंत्री कोल्हापुरात दाखल होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल दिल्ली मध्ये होते. आज दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री विमानाने कोल्हापूरला येणार आहेत. संद्याकाळी 4 वाजता ते कोल्हापूर विमानतळावर उतरणार आहेत. तिथून ते छत्रपती संभाजी पार्क येथील पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचतील आणि संद्याकाळी 5 सुमारास मुख्यमंत्री विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या सांत्वनासाठी ते कोल्हापूरला येत आहेत.

हेही वाचा : 

राज्यात पुरामुळे नुकसान झालेल्या भागात नुकसान भरपाई मिळणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी 23 जुलै पनवेलमधील भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत “आपण मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले” असे त्यांनी वक्तव्य केले. त्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे भाजपाने चंद्रकांत पाटलांच्या भाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवला. परंतु त्यानंतरही सोशल मीडियावर चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया येत होत्या. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्यातील विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न केला.

भारतात गरीब स्वप्नंही पाहू शकतो आणि पूर्णही करु शकतो ; द्रौपदी मुर्मू यांनी शपथविधीनंतर जनतेला केले संबोधित

Exit mobile version