मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. यादरम्यान, राज्याच्या राजकारणात अनेक खळबळजनक गोष्टी घडताना दिसल्या. तसेच, अनेक नवी समीकरणं जुळल्याचं पाहायला मिळालं. अशाच एका समीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. ती म्हणजे, भाजप (BJP), शिंदे गट आणि मनसेच्या (MNS) युतीची. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते, शिंदे गटातील (Shinde Group) नेते यांच्या आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीगाठी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

मागच्या काही दिवसांपासून काही राजकीय भेटींची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीत आणखी एका पक्ष येऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनी आमची सर्वांची मनं जुळलेली आहेत, फक्त वरुन तारा जुळल्या की सर्व जुळून येईल अस मोठं विधान केलं आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी मनसेपक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. श्रीकांत शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागचे कारण स्पष्ट झालं नसलं तरी मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेंनी घेतलेली भेट ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे.

पक्षाविरोधात बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यापूर्वी आणि त्यानंतरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या विसास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. याव्यतिरिक्त अनेक शिंदे गटातील नेते आणि भाजप नेत्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच भाजप, शिंदे गट आणि मनसेची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत होती. अशातच आता मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच, भाजप, शिंदे गट आणि मनसेच्या महायुतीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

हे ही वाचा :

Ram Setu Twitter Review : राम सेतू चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिल्या रिअँक्शन

शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; नाना पटोलेंची मागणी हास्यास्पद-एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version