चित्रा वाघ उर्फी जावेदच्या ड्रेससिंगवर संतापल्या, पोलिसांकडे केली ‘हि’ मागणी

चित्रा वाघ उर्फी जावेदच्या ड्रेससिंगवर संतापल्या, पोलिसांकडे केली ‘हि’ मागणी

Urfi Javed : आपल्या ड्रेससिंगमुळे नेहेमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद (Urfi Javed) आता वादात सापडण्याची शक्यता आहे. तिने फॅशन म्हणून परिधान केलेल्या प्रत्येक कपड्यांची सोशल मीडिया तसेच माध्यमांकडून दखल घेतली जाते. याच विचित्र फॅशन सेन्समुळे तिला काही लोकांकडून टोकाचा विरोधही केला जातो. विचित्र वाटणारे वस्त्र परिधान करू नयेत, असा सल्ला अनेकजण तिला देतात. तर काही जण तिच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीकरतात. दरम्यान, आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यादेखील उर्फी जावेदवर भडकल्या आहेत. उर्फी जावेदला नंगटपणा करणारी बाई म्हणत त्यांनी तिच्या अटकेची मागणी केली आहे.

उर्फी जावेद कायमच तिच्या वेशभूषेमुळे चर्चेत असते. ब्लेड्स गुंफून तयार केलेला ड्रेस, स्वतःचे फोटो, तर कधी नुसतीच पाईप गुंडाळून ती ड्रेस बनवते. त्यामुळे कायमच तिची चर्चा होत असते. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींना (Rahul Gandhi) ट्रोल करण्यासाठी भाजपाकडून उर्फी जावेदच्या नावाचा वापर करण्यात आला होता. राहुल गांधींना लक्ष्य करण्यासाठी गुजरातमधील एका भाजपा कार्यकर्त्याने एक ट्वीट केले होते. या ट्वीटमुळे उर्फी चांगलीच भडकली होती. या ट्वीटवर तिनं आक्रमक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले होते. तसेच, आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram account) स्क्रीनशॉट शेअर करत संताप व्यक्त केला होता. उर्फीच्या या भूमिकेनंतर अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा:

Sharad Pawar सरत्या वर्षांने काय दिलं? आणि २०२३ कडून काय अपेक्षा?, राष्ट्रवादीचा मोदी सरकारला सवाल

Thane News ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, शिंदे गटाकडून हल्ला झाल्याचा आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version