spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘हीच का तुमची शिवभक्ती?’ म्हणत MVA च्या ‘जोडे मारो’ आंदोलनावर Chitra Wagh आक्रमक

मालवणमधील राजकोट (Rajkot) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Chhatarpati Shivaji Maharaj Statue Collapse) राज्यातील महायुती सरकारविरुद्ध (Mahayuti Government) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज (रविवार, १ सप्टेंबर) “जोडे मारो आंदोलन” (jode Maro Andolan) पार पडत आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत हा मोर्चाचे नेण्यात येणार आहे. या नांदोलनांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीमधील इतर प्रमुख नेते सहभागी होणार आहे. या आंदोलनासाठी मुंबईसह राज्यातील इतर भागांमधून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचे दिसत आहे. अश्यातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी यावरून महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला असून मविआमधील (MVA)  नेत्यांवर आंदोलनासंदर्भात प्रश्न उपस्थित करत कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रा वाघ यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आपल्या ट्विटरवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात त्यांनी ट्विट्सचा धडाका लावला. पोस्ट करत शरद पवार यांच्यावर सवाल उपस्थित करत त्या म्हणाल्या, “पवार साहेब शिवरायांच्या मावळ्यांवर मावळमध्ये गोळीबार केला, तेव्हा आदेश कुणाचे…? हीच का तुमची शिवभक्ती…?” शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करत त्या म्हणाल्या, “उद्धव ठाकरे…. ज्या मातीत छत्रपती संभाजीराजेंचे रक्त सांडले, ती औरंगजेबाची भूमी होणार, हे म्हणताना जीभ का कचरली नाही…? हीच का तुमची शिवभक्ती…?” काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांना लक्ष्य करत त्या पुढे म्हणाल्या, “नाना पटोले…. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने शिवरायांचा पुतळा हटविला, तेव्हा तुमची जीभ गोंदियात लटकली होती का…? हीच का तुमची शिवभक्ती…?”

त्या पुढे म्हणाल्या, “विजय वडेट्टीवार….. मराठी माणसाचे रक्त सांडल्यावर विरोध होऊ नये, प्रतापगडावर शिवरायांच्या पुतळा अनावरणासाठी लपूनछपून येणार्‍या नेहरुंचाच तुम्ही वारसा सांगता ना..? लाज नाही वाटत..? हीच का तुमची शिवभक्ती…?” आदित्य ठाकरेंवर टीका करत त्या म्हणाल्या, “आदित्य ठाकरे… विशाळगडावर अतिक्रमण झाले, तुम्ही गेले होता काय…? हीच का तुमची शिवभक्ती..?” संजय राऊतांवर टीका करत त्या म्हणाल्या, “ओऽऽऽसर्वज्ञानी संजय राऊत, विशाळगडावरील अतिक्रमण काढले, तेव्हा चकार तरी बोलतात काय…? हीच का तुमची शिवभक्ती…?

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss