हा ‘रडतरौत’ फक्त फेकाफेकी करतो, खोटं बोलतो, Chitra Wagh यांची Sanjay Raut यांच्यावर आगपाखड

हा ‘रडतरौत’ फक्त फेकाफेकी करतो, खोटं बोलतो, Chitra Wagh यांची Sanjay Raut यांच्यावर आगपाखड

Nagpur Car Accident: नागपूर हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) याचे नाव समोर येत आहे, यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी यावरून भाजपला (BJP) लक्ष केले आहे. एकीकडे विरोधक यावरून चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत असतानाच आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धक्कादायक दावा केला. अपघाताआधी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे ज्या लाहोरी बारमध्ये बसला होता तेथील बिल गाडीत सापडले असून त्यात दारूसोबत बीफचे देखील बिल असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या आरोपानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय म्हणाल्या चित्रा वाघ ?

चित्रा वाघ यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, “खोटारड्या रडतरौताचं थोबाड फुटलं ! ‘खोटं बोल पण रेटून बोल..’ हे ब्रीदवाक्य तंतोतंत पाळणाऱ्या रडतरौताचं थोबाड साफ फुटलं आहे. या नतद्रष्ट महाभागाने गेली काही वर्षे रोज सकाळी खोटं बोलून ‘फेक नॅरेटिव्ह’ चालवण्याचा धंदा उघडला आहे. नागपूरमधील एका हॉटेलच्या बिलाचा संदर्भ देऊन तेथे ‘बीफ कटलेट’ दिले गेल्याचा खळबळजनक आरोप करून सनसनाटी उडवण्याचा रडतरौतानं आज प्रयत्न केला होता. पण, त्या हॉटेल मालकाने त्याचा खोटारडेपणा उघडा करून त्याला तोंडावर पाडले आहे. एवढेच नव्हे तर, त्या हॉटेल मालकाने तक्रार दाखल केली असून रडतरौताविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे त्याने सांगितले आहे. एक बरं झालं, हा रडतरौत फक्त फेकाफेकी करतो, खोटं बोलतो आणि बिनपुराव्याचं बोलतो, हे तर जनतेच्या लक्षात आलं आहे. असल्या खोटारड्या माणसाचा तीव्र शब्दात निषेध करावा, तेवढा थोडाच आहे,” असे त्या यावेळी म्हणाल्या.

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते. “त्या गाडीत लाहोरी बार मधील जे बिल मिळाले आहे त्याच्यावर खाण्याचे पिण्याचे बिल आहे ते बिल लोकांसमोर आणले पाहिजे. त्याच्यामध्ये दारूचे बिल आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात चिकन, मटन आणि त्याबरोबर बीफ कटलेट ह्याचे देखील बिल त्याच्यात आहे आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात. श्रावण आहे, गणपती आहे अमुख आहे हिंदुत्व आहे. तुम्ही बीफ खायचे आणि लोकांचे बळी रस्त्यावर घ्यायचे, ज्या प्रकरे देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहखाते चालवत आहात तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही,” अख्या शब्दांत त्यांनी टीका केली होती.

हे ही वाचा:

आरक्षणावरील Rahul Gandhi यांच्या विधानाचा BJP कडून विपर्यास, Nana Patole यांचे टीकास्त्र

Sandeep Deshpande Exclusive: कोणाचं आडनाव काय आहे, याने मला फरक पडत नाही कारण…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version