बारामतीच्या मोठ्या ताईंकडून जातीयवादाची विष पेरणी सुरू; Chitra Wagh यांची Supriya Sule यांच्यावर आगपाखड

बारामतीच्या मोठ्या ताईंकडून जातीयवादाची विष पेरणी सुरू; Chitra Wagh यांची Supriya Sule यांच्यावर आगपाखड

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रवक्त्यांसमवेत झालेल्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांबाबत मार्गदर्शन करताना “जरांगे-शिंदे यांच्याशी वैर नाही, पण देवेंद्र तुझी खैर नाही!” अशी घोषणा केली होती होती. यावरून आता राजकारण तापले असून भाजप नेते आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करू नका असे आवाहन करत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना टार्गेट करण्याचे आवाहन प्रवक्त्यांना केले होते. आता यावर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळेंवर चांगलीच आगपाखड केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करत त्यांनी, “बारामतीच्या मोठ्या ताईंकडून जातीयवादाची विष पेरणी सुरू झाली आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

चित्रा वाघ यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत सुप्रिया सुळेंवर टीका केली. त्या म्हणाल्या, “बारामतीच्या मोठ्या ताईंकडून जातीयवादाची विष पेरणी सुरू.. समाजामध्ये जातीयवादाची विष पेरणी करण्याचे काम बारामतीच्या मोठ्या ताईंनी सुरू केले आहे. त्यांच्या पक्षाची मूळ विचारधाराच जातीयवाद असल्यामुळे त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय ठेवायची?”

“बारामतीच्या मोठ्या ताईंनी आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना ‘टार्गेट’ करण्याचे आदेश दिले आहेत. “जरांगे-शिंदे यांच्याशी वैर नाही,पण देवेंद्र तुझी खैर नाही” असा संदेश देण्यामागे त्यांचा जातीयवादी दृष्टिकोन स्पष्ट दिसतो. पुरोगामीत्वाचा मुखवटा घातलेल्या मोठ्या ताईंनी अजितदादांनाही टोकले आहे आणि आपण त्यांची ‘किडकी बहीण’ आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.”

“बारामतीच्या मोठ्या ताई, ‘अकेला देवेंद्र क्या करेगा?’ असे तुमचे वक्तव्य आठवते का? त्यानंतर तुमची आणि तुमच्या पक्षाची झालेली अवस्था आठवते का? अहो मोठ्या ताई, तुम्ही कितीही जातीयवाद केला, आदळ आपट केली, तरी विकासकामानेच उत्तर देण्याचा चंग मा.देवेंद्रजी यांनी बांधला आहे, विष पेरणीला विकासकामाने उत्तर, हे भाजपाचे धोरण आहे. तुमच्यासारख्या फालतू टीकांना उत्तर देण्यासाठी मुळीच वेळ नाही. तुम्ही बोलत राहा.. बोलत राहा.. विषारी बीजे पेरत राहा, नंतर त्यांना येणारी विषारी फळे देखील चाखत राहा!”

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी ‘शरद पवार से बैर नही, समरजित घाटगे कि खैर नही’ असे म्हणत इशारा दीला होता. आता त्याच डायलॉगचा वापर करून सुप्रिया सुळे यांनी महायुतीला इशारा दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांसमवेत झालेल्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रवक्त्यांना मार्गदर्शन करताना “एकनाथ शिंदेसे बैर नही, देवेंद्र फडणवीस तेरी खैर नही,” असे वक्तव्य केले होते. तसेच, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करू नका असे आवाहन त्यांनी केले होते.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde यांच्या हस्ते मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष” लोकार्पण सोहळा संपन्न

महाराष्ट्राचा स्वाभिमान मोदीकडे गहाण ठेवू नका, राज्यात मविआचे सरकार आणा: Mallikarjun Kharge

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version