देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड प्रकरणी चित्रा वाघ यांचा हल्लाबोल, हे एखादे षडयंत्र तर नाही ना?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड प्रकरणी चित्रा वाघ यांचा हल्लाबोल, हे एखादे षडयंत्र तर नाही ना?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मंत्रालयात तगडी सुरक्षाव्यवस्था असतानाही ही महिला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयापर्यंत कशी पोहोचली, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता याबाबत सर्वच स्तरावरून प्रतिक्रिया या उमटू लागल्या आहेत. आता भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

यावेळी बोलत असताना चित्र वाघ म्हणाल्या आहेत कि, ही महिला मंत्रालयात घुसलीच कशी? अशी आवई उठवणाऱ्या विरोधकांना एकच सांगणे आहे की सगळे प्रवेश करतात त्याच पद्धतीने ती गेली असणार. हे सरकार सर्वसामान्याचे सरकार आहे, त्यामुळे अनेक जण कामासाठी मंत्रालयात येतात, पण प्रत्येकाच्या मनात काय चाललयं हे समजू शकत नाही. सत्यस्थिती समोर आल्यावर स्पष्ट होईलचं तरीही हा एखाद्या षड्यंत्राचा भाग तर नाही ना, याची मात्र त्वरित चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

हे एखादे षडयंत्र तर नाही ना? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून एका महिलेने केलेल्या तोडफोडीची सखोल चौकशी व्हावी, तिच्यामागे नेमके कोण आहे, हे उघड व्हायलाच हवं. सर्वात प्रथम या महिलेची मानसिकता काय आहे हे तपासून तिने केलेले कृत्य कशासाठी केले.? यामागील षडयंत्र काय आणि कोणाचे हे पाहायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली. सध्या फडणवीस यांच्या राज्यभर सभा आणि बैठका होत आहेत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हे ज्याला पाहवत नाही त्याने या महिलेच्या हातून तर हे कृत्य करून घेतले नाही ना, हे ही त्वरित तपासणे गरजेचे आहे, या मागे कोणाचा हात आहे हे समोर यायला हवं, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

नेमकं काय घडलं ?

मुंबई मंत्रालयात असलेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आज (२७ सप्टेंबर) एका महिलेने गोंधळ घातला. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची नेम प्लेट काढून खाली फेकली. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ही घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिलेचा चेहरा दिसत आहे. पोलिसांनी अज्ञात महिलेचा शोध सुरू केला आहे. एका अनोळखी महिलेने अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड सुरू केली आणि मंत्रालयातून बाहेर पडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला पास न घेताच मंत्रालयात दाखल झाली होती. ही महिला सचिवालयाच्या गेटमधून मंत्रालयात दाखल झाली.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde मुंबई खड्डेमुक्त करणार होते, एवढ्या गंभीर परिस्थितीत ते कुठे होते? Aaditya Thackeray यांचा सवाल

एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी आज सहाव्यांदा येणार होते सुप्रिया सुळे यांनी करून दिली आठवण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version