उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, चित्रा वाघ यांचा उर्फीवर हल्लाबोल

गेल्या अनेक दिवसांपासून चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात सोशल मीडिया वाद हा सुरु आहे. यांचा हा वाद आता हळू हळू मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे.

उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, चित्रा वाघ यांचा उर्फीवर हल्लाबोल

गेल्या अनेक दिवसांपासून चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात सोशल मीडिया वाद हा सुरु आहे. यांचा हा वाद आता हळू हळू मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यांच्या दोघींच्या या वादात सुषमा अंधारे यांनी उडी घेतली होती आणि या पाठोपाठ आता रुपाली चाकणकर यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. परंतु हा वाद इतक्या दिवस फक्त सोशल मीडिया पुरता मर्यादित होता आता हा वाद इतका वाढला आहे कि चित्रा वाघ यांनी आता आक्रमक भूमिका घेत पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. वेब सिरिजवरुण तेजस्वीनी पंडित यांना नोटिस पाठवणाऱ्या महिला आयोग आता उर्फी जावेदवर काय करणार असा सवाल करत चित्रा वाघ यांनी सवाल उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये नंगानाच चालू देणार नाही, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिला दिला आहे.

 

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका हि घेतली आहे. त्या म्हणल्या आहेत कि, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये असा नंगानाच चालू देणार नाही. आमचा उर्फीला विरोध नाही, पण तिचा जो नंगानाच सुरु आहे, त्या गोष्टींना आमचा विरोध आहे, असे म्हणत चित्रा वाघ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुढे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत, अरे आधी कपडे तर घाला मग ठरवा कुणी काय घालायचे. ज्या ठिकाणी समाज महत्वाचा असतो त्याठिकाणी राजकारण करू नये. पण दुर्दैवाने आपल्या राज्यात तसे झाले नाही. तिचा जो नंगा नाच सुरू आहे ते आपल्या महाराष्ट्र्ला शोभनीय नाही. असला नंगा नाच राज्यात चालू देणार नाही, असे देखील चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

कोणी काय कपडे घालावे हा पूर्णपणे ज्याचा त्याचा अधिकार आहे असे महिला आयोग म्हणतंय. महिला आयोग म्हणत अशासाठी वेळ घालवणार नाही, महिला आयोगाला जाब विचारायचा नाही मग काय करायचे? केसेस सोडवणे तुमचे काम आहे. तुम्ही अशा अश्लील व्हिडिओची दखल घेतली नाही मग आयोगाच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा सवाल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर याना चित्रा वाघ यांनी विचारला आहे. तसेच उर्फी जावेदच्या प्रकरणात महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत आहे असं म्हणत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका करत सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. तसेच चित्रा वाघ पुढे म्हणल्या आहेत कि, संजय जाधव आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांना धूम्रपान समर्थन अंगप्रदर्शनचा संदेश जात असल्याचे सांगत नोटीस बजावली होती. मग आता कोणती भूमिका का नाही घेत .

हे ही वाचा:

महापालिका निवडणूक करण्याची हिंमत दाखवावी, आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान

विमानात महिलेवर लघवी करणाऱ्याला पोलिसांनी पकडण्याआधीच आरोपी फरार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version