किरीट सोमय्याच्या प्रकरणावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडीओमुळे राज्यामध्ये अनेक आक्रमक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. त्याचबरोबर राज्यामधील अनेक जिल्यांमध्ये किरीट सोमय्या यांच्याविरोधात अनेक आंदोलने सुद्धा करण्यात आली होती.

किरीट सोमय्याच्या प्रकरणावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडीओमुळे राज्यामध्ये अनेक आक्रमक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. त्याचबरोबर राज्यामधील अनेक जिल्यांमध्ये किरीट सोमय्या यांच्याविरोधात अनेक आंदोलने सुद्धा करण्यात आली होती. यांचदरम्यान भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी किरीट सोमय्या यांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाच्या संदर्भामध्ये चित्रा वाघ यांनी यावेळी किरीट सोमय्या यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ प्रकरणी (Chitra Wagh on Kirit Somaiya) प्रतिक्रिया दिली. किरीट सोमय्या प्रकरणी कुणी ताई समोर आली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. जो प्रकार झाला तो चुकीचाच झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाऊसमध्ये याबाबत आश्वासन दिलं आहे. या प्रकाराने आम्हाला धक्का बसला आहे. भविष्यात याची पाळंमुळं शोधली जातील, असेही त्यांनी सांगितले.

शासकीय स्तरावरील कामं आता महिलांना हाती घेता येणार आहेत. तालुका स्तरावर महिलांना काम करण्याची संधी मिळणार आहे. राज्यस्तरावरील टीमची या सगळ्या संस्थांवर नजर असणार आहे, या संस्था पुरुषांच्या हातात जावू देणार नाही, असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. त्या आज कोल्हापूरमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांनी बोलताना अनेक मुद्यांवर भाष्य केले. मणिपूरमधील महिलांवर झालेल्या अत्याचाराचा मी निषेध करत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, मी मणिपूरच्या घटनेचा निषेध करते, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे असे त्या म्हणाल्या.

पुढे ते म्हणाल्या की, चर्चेला तयार झाल्यानंतर विरोधक मागे गेले. कारण, राहुल गांधी हे संसदेत नाहीत, त्यामुळे याचं राजकारण केलं जात आहे. सगळ्यांनी मिळून अशा घटनेला विरोध केला आहे. मणिपूरबरोबर इतर ठिकाणी घडलेल्या घटनेवर विरोधक बोलत नाहीत. मी इथेच आहे कुठेही गेलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे झालं ते नवीन नाही, ते होणारच होतं, कधी होणार हे फक्त माहीत नव्हतं. आता जे व्हायचं ते झालं आहे. आम्ही अजितदादा यांचं अभिनंदन केलं. त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्याचं आम्ही स्वागत केलं आहे. रुपाली चाकणकर आणि माझं काही बांधाला बांध नाही, जिथं गोष्टी मनाला पटत नाही, तिथं आम्ही बोलून दाखवू असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

अश्विनने या खेळाडूला मागे टाकत केला नवीन विक्रम

पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध , आंदोलन

गणपती स्पेशल रेसिपी: घरीच बनवा बाप्पासाठी मोदक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version