उर्फी आणि चाकणकरांच्या भेटीवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया म्हणाल्या, उर्फिने नीट कपडे

उर्फी जावेदच्या कपड्यांबाबत वक्तव्य करताना चित्रा वाघ यांनी असे म्हटले आहे की, उर्फी कुठेही जाऊदे पण तिने नीट कपडे घालावे

उर्फी आणि चाकणकरांच्या भेटीवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया म्हणाल्या, उर्फिने नीट कपडे

उर्फी जावेद (Urfi Javed)ही नेहमीच तिच्या वेगळ्या आणि लोकांना काहीशा विचित्र वाटणाऱ्या फॅशन सेंसमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या या कपडे घालण्याच्या पद्धतीमुळे ती नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. तर, याच फॅशन सेंसमुळे ती कधी – कधी हॉलीवूड सिनेतारकांच्या कौतुकास पात्र ठरते. पण यावेळी उर्फी फक्त ट्रॉलर्सच्या नाही भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याही निशाण्यावर आली आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीवर केलेल्या टीकेमुळे उर्फी विरुद्ध चित्रा वाघ अशा वादाला सुरुवात झाली आणि नंतर त्यात महिला आयोगाची देखील एन्ट्री झाली आणि त्यानंतर हा वाद अजूनच ज्वलंत झाला आहे.

या वादाला अनुसरून उर्फी जावेद (Urfi Javed) ही आता रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणजेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांची भेट घेणार असल्याची महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे. उर्फी जावेद, चित्रा वाघ यांनी तिच्यावर केलेल्या आरोपांसंबंधित चर्चा करण्यासाठी रुपाली चाकणकर यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. उर्फी जावेद आणि रुपाली चाकणकर यांची ही भेट राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात होणार आहे.

यादरम्यानच उर्फी जावेद आणि रुपाली चाकणकर यांच्या या भेटीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एकाअर्थी चित्रा वाघ यांनी नुसती प्रतिक्रिया नाही तर, रुपाली चाकणकर यांची भेट घेण्यापूर्वी उर्फी एक सल्लाच दिलाय. उर्फी जावेदच्या कपड्यांबाबत वक्तव्य करताना चित्रा वाघ यांनी असे म्हटले आहे की, उर्फी कुठेही जाऊदे पण तिने नीट कपडे घालावे, तर उर्फीने नीट कपडे घालूनच हे प्रकरण मिटवावं, असेही उर्फी जावेद त्यांच्या या प्रतिक्रियेत म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा:

घामाचा दाम मिळणार ! एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून ३०० कोटींचा निधी मंजूर

Nashik Sinnar Accident , सिन्नर तालुक्यात भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version