Tuesday, July 2, 2024

Latest Posts

चोपडा बस स्थानकाने पटकावला स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा किताब..

राज्य परिवहन मंडळ आयोजित एसटी महामंडळाने (Maharashtra State Road Transport Corporation) घेतलेल्या "हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक" अभियानांतर्गत 'अ' वर्गामध्ये राज्यात जळगावं  जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून, या बसस्थानकाला रोख रक्कम ५० लाखाचे बक्षीस मिळाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अनेक उपक्रम नागरिकांच्या भेटीसाठी घेऊन आले होते. जेणेकरून त्या उपक्रमांनी नागरिकांचे आरोग्य सुधारू शकेल. दोन वर्षांचे कोरोना संकट त्यानंतर एसटी कर्मचाऱ्याचा पाच महिन्याचा संप यामुळे एसटीच्याप्रवासी संख्येत घट झाली आणि राज्य परिवहन महामंडळाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. मात्र गेल्या वर्षभरापासून एसटी महामंडळाने पुन्हा एकदा एसटीचा गाडा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यापैकीच एक प्रयत्न म्हणजे “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” हा उपक्रम होय.

राज्य परिवहन मंडळ आयोजित एसटी महामंडळाने (Maharashtra State Road Transport Corporation) घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगावं  जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून, या बसस्थानकाला रोख रक्कम ५० लाखाचे बक्षीस मिळाले आहे. या अभियानांतर्गत ‘ब’ वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बसस्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आला आहे. या बसस्थानकाला २५ लाखाचे बक्षीस मिळाले आहे. तसेच ‘क’ वर्गामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातील मेढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांकात समावेश झाला आहे.
या बसस्थानकाला १० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. मा. मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संकल्पनेतून १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या काळादरम्यान  एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर” हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ-सुंदर बसस्थानक अभियान ” राबविले गेले होते. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित हे अभियान आहे. यासाठी स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभिकरणकरण्यात आले होते. तसेच या बरोबरच  प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा-सुविधा, बसेसच्या स्वच्छते बरोबरच त्यांची तांत्रिक दुरूस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळया सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षीसासाठी निवड करण्यात आली आहे.
निवडप्रक्रिया कशी पार पाडण्यात आली ?
  • ही स्पर्धा राज्यभरातील ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली असून, या सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते.
  • पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले. प्रत्येक प्रदेशातील  प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या बसस्थानकाला राज्यस्तरावरील अंतीम फेरीसाठी  निवडण्यात आले.
  • त्यातून सर्वाधिक गुण मिळवणारे बसस्थानक पहिल्या क्रमांकासाठी निवडण्यात आले. या स्पर्धेसाठी तब्बल अडीच कोटी रूपयाची बक्षीसे देण्यात येणार असून, येत्या १५ ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
  • प्रदेशनिहाय बक्षीस पात्र बसस्थानकांची यादी सोबत जोडली आहे. एसटी महामंडळाचे मा.उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर (Dr. Madhav Kusekar) यांनी सर्व बक्षीस पात्र बसस्थानकांचे अभिनंदन केले आहेत.

या अभियानातून “आपलं गावं आपलं बसस्थानक, स्वच्छ सुंदर बसस्थानक” ही संकल्पना एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबरच स्थानिक रहिवाश्यांमध्ये रूजविण्यास मदत झाली. असे  प्रतिपादन त्यांनी केले.  आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेमध्ये बागबगीचा, वृक्षरोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकांवर वॉटरकुलर, घड्याळ, सेल्फीपॉईंट, इत्यादी कामे करण्यात आली होती.

Latest Posts

Don't Miss