मेटेंच्या अपघाती प्रकरणी सीआयडी चौकशी होणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश

शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूची आता सीआयडी (CID) चौकशी होणार आहे.

मेटेंच्या अपघाती प्रकरणी सीआयडी चौकशी होणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश

शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूची आता सीआयडी (CID) चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत. मेटेंचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. हा अपघात घडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. विनायक मेटे यांच्या कुटुंबियांनी आणि समर्थकांनी त्यांचा मृत्यू अपघात की घातपात असा संशयवजा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची राज्य सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी देखील अपघाताच्या त्या दोन तासात काय झालं ? याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती. अशातच आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज विनायक मेटेंच्या अपघातापूर्वी त्यांच्यासोबत असलेले आणि त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांचा असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर मेटे यांच्या अपघाती मृत्यूची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीआयडी चौकशीचे पोलीस महासंचालकांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

विनायक मेटे यांच्या कारला पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला. १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता हा अपघात झाला. यामध्ये मेटे यांचं निधन झालं. पतीच्या अपघाती निधनावर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केला असून मेटेंच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षासाठी मोठा लढा उभा केला होता. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम जी एम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ याना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी न झाल्यास शिवसंग्रामकडून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून अपघाताची चौकशी करावी. ज्या गाडीनं काही दिवसांपूर्वी त्यांचा पाठलाग केला होता, त्या गाडीचा नंबर देखील समोर आला असून त्याचा देखील शोध पोलिसांनी घ्यायला हवा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

दरम्यान, मेटे यांच्या निधनामुळं त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विधानपरिषदेवर राज्यपाल कोट्यातून संधी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. शिवसंग्राम संघटना भाजपसोबत युतीत आहे. त्यामुळं त्यांच्या पत्नीला आमदारकीची संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे.

 

हे ही वाचा :-

एकाकी ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी रतन टाटांची गुडफेलोमध्ये गुंतवणूक

२१५ कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर आरोपपत्र दाखल

Exit mobile version