भुकंप झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहून…,अजित पवार

भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही पण यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर याच भूकंपाचे पडसाद आज विधानभवनात उमटले आहेत.

भुकंप झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहून…,अजित पवार

Marathwada Vidarbha Earthquake: विदर्भातील एका जिल्ह्यात तर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. १० जुलै रोजी पहाटे झालेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मराठवाडा जिल्ह्यातील हिंगोली (Hingoli), परभणी (Parbhani), नांदेड (Nanded) या तीन तर विदर्भातील वाशिम (Washim) या जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही पण यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर याच भूकंपाचे पडसाद आज विधानभवनात उमटले आहेत.

आज दिनांक ७ जुलै २०२४ रोजी अजित पवार यांनी नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहण्यास सांगितले आहे. यावेळी अजित पवार म्हणाले आहेत की, राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झाली नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत राज्य शासनाच्यावतीने निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची राज्य शासनाने गंभीर नोंद घेतली असून संबंधित जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये, मात्र सतर्क राहून बचावासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. गावांमध्ये ज्या घरांवर पत्र्याचे छत आहे, त्यावर आधारासाठी ठेवलेले दगड काढून टाकावेत, असे आवाहन नागरिकांना केले आहे. राज्य शासन संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या भूकंप आणि नुकसानीसंदर्भातील अधिकची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे असेही अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.

नेमकं काय घडलं ?

सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवले. परभणी शहर (Parbhani City), सेलू, गंगाखेड या ठिकाणी भूकंप झाला. भूकंपाचा हा धक्का ४.२ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यांमध्ये ७:१५ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये भूकंप झाल्यामुळे नागरिक घाबरले होते. हिंगोली (Hingoli) मध्ये झालेला भूकंप हा ४.५ रिश्टर स्केल इतका होता. यासोबतच मराठवाड्यालगत असलेल्या वाशिम (Washim) मध्ये सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी त्यानंतर सात वाजून १४ मिनिटांनी दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. जयपुर, सावळी कृष्णा या गावांमध्ये पत्र्याचा मोठा आवाज झाला.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version