भाजपबरोबर असलेले सर्व नेत्यांना क्लीन चिट आणि विरोधक मात्र भ्रष्टचारी – भास्कर जाधव

भाजपबरोबर असलेले सर्व नेत्यांना क्लीन चिट आणि विरोधक मात्र भ्रष्टचारी – भास्कर जाधव

शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आज कुडाळमध्ये भाजप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाजप बरोबर असलेले सर्व नेत्यांना क्लीन चिट आणि विरोधक मात्र भ्रष्टचारी असं म्हणत भास्कर जाधव यांनी टीका केली आहे.

आमदार यामिनी जाधव यांच्या घरात किती कोटी रुपये आहेत? उद्धव ठाकरे गटात असताना त्यांच्यावर इनकम टॅक्सच्या भरपूर चौकश्या झाल्या आणि आता त्या शिंदे गटात आहेत तर भ्रष्टाचार मुक्त झाल्या, प्रताप सरनाईकांना देखील दोन वर्ष नाना प्रकाराने छळलं आता ते शिंदे गटात गेल्यावर त्यांना क्लीन चिट देण्यात आली आणि ते भ्रष्टाचार मुक्त झाले . संजय राठोड उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा पूजा चव्हाण नावाच्या महिलेचा छळ झाला तिने आत्महत्या केली त्या मागे संजय राठोड हेच आहेत अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सातत्याने आरोप करण्यात आले. भाजपच्या चित्रा वाघ रोज आरोप करायच्या पण आता त्या कुठे आहेत . असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला.

तसेच ते पुढे म्हणाले कि त्यावेळी संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला , आज त्यांना सन्मानाने मंत्रिमंडळात घेतले आहे तर आता त्या पूजा चव्हाणांना न्याय मिळाला का असा सवाल देखील भास्कर जाधव यांनी चित्र वाघ यांना विचारला आहे. तसेच भास्कर जाधव यांनी आरोप केले कि माजी गृह मंत्री अनिल देशमुख, ठाकरे सरकार मधील मंत्री नवाब मलिक यांना भ्रष्टाचार व बॉम्बस्फोटाच्या आरोपावर अटक करण्यात आली परंतु जेव्हा पहाटे पाच वाजता फडणवीस आणि अजित पवार यांची शपथविधी झाला तेव्हा अनिल देशमुख व नवाब मलिकही अजित पवारांसोबत होते त्यावेळी फडणवीसांना हे समजले नाही का असा सवालही भास्कर जाधव यांनी विचारला आहे .

शिवसेनेने काही केले नाही, असे नारायण राणे म्हणतात. मग नारायण राणे एकोणचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये राहून काय म्हशी भदरात होते ?अश्या शब्दांत भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली.

हे ही वाचा :

Ashish Shelar : BCCIनं सोपवली आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी; नवे खजिनदार म्हणून नियुक्ती

Diwali २०२२ : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट ; ऑक्टोबर महिन्याचं वेतन दिवाळीआधीच

एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांची भेट; खोके नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version