spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अजित पवारांना दिलेली क्लिनचीट अद्याप प्रलंबित ?

मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे बडे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारागृहात आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देखील अटक करण्यात आली आहे.

मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे बडे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारागृहात आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक नेता लवकरच कारागृहात जाणार असल्याचा सूचक इशारा भाजप नेते मोहित कंबोज यांच्याकडून देण्यात आला होता. त्यांचा रोख अजित पवारांकडे होता. एकीकडे मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटवरुन राजकिय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बाबतची आणखी एक मोठी माहिती समोर आलेली आहे. अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणातून एसीबीकडून देण्यात आलेल्या क्लीन चिटचा रिपोर्ट अजूनही उच्च न्यायालयाने स्वीकारला नाही.

अजित पवारांना देण्यात आलेली क्लिनचीट अद्याप प्रलंबित असल्याचं समोर आलं आहे. अजित पवारांना २०१९ साली सिंचन घोटाळ्यातून क्लीन चिट देण्यात आली होती. परमबीर सिंह यांनी ही क्लीन चिट दिली होती. पण तो अहवाल अद्याप मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारला नसल्याचं समोर आले आहे. दोन वर्षांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हा अहवाल स्वीकारला नसल्याचं समोर आलं आहे. क्लिनचीट दिल्यानंतर नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यात अजित पवार यांना व्हीआयडीसी प्रकरणात क्लिनचीट देऊन त्यात त्यांचा रोल नाही, असं म्हटलं होतं. मात्र या क्लिनचीटला नागपूर खंडपीठाने स्वीकरलेलं नाही. त्यामुळे अद्याप अजित पवार यांची क्लिनचीट न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटची चर्चा सुरू आहे. अजित पवार यांना केवळ तपास यंत्रणांनी क्लिनचीट दिली होती. त्यामुळे अजित पवार यांच्यावर अजुनही टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे.

अजित पवार यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस यांनी आखलेलं षडयंत्र असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटलंय. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा एकदा चौकशी करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणी फक्त एसीबीने क्लीन चीट दिली आहे, पण न्यायालयाने तो अहवाल अद्याप स्वीकारला नाही असंही ते म्हणाले.

 

हे ही वाचा :-

एलोन मस्कचे मँचेस्टर युनायटेड विकत घेत असल्याचे ट्विट झाले व्हायरल

एकाकी ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी रतन टाटांची गुडफेलोमध्ये गुंतवणूक

Latest Posts

Don't Miss