Sunday, July 7, 2024

Latest Posts

नाशिक मतदारसंघात शिंदे सक्रिय; नाशिकचा पेच Eknath Shinde सोडवणार ?

महायुतीतील दोन पक्षातील उमेदवार या निवडणुकीत रिंगणात असल्याने याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी देखील विजयासाठी कंबर कसली असून जोरदार आरोप प्रत्यारोपाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवारामुळे महायुतीला अधिक धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता आहे. 

नुकताच लोकसभेचा पेच सुटला असताना आता शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांसाठी सर्व पक्षीयांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यातं आल्याने पक्षातील नेत्यांची चांगलीच तयारी सुरु आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते माघार घेईपर्यंत त्याचप्रमाणे लोकसभेत देखील अधिक चर्चेत असलेला नाशिक मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) हे नाशिक दौऱ्यावर असून आपल्या उमेदवारासाठी मैदानात उतरले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक शिक्षक मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी नाशिक,जळगाव आणि शिर्डी दौरा करत बैठक घेणार आहेत आणि त्याचबरोबर विविध संस्थांच्या पदाधिकारी आणि शिक्षकांसोबत चर्चा करणार आहेत. लोकसभेत नाशिक मतदारसंघ हा चांगलाच चर्चेत आला होता मात्र पुन्हा एकदा या मतदारसंघाने लक्ष वेधलं आहे.

लोकसभेप्रमाणेच नाशिक मतदारसंघात महायुतीत पेच निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या सेनेच्या उमेदवाराविरोधात राष्ट्रवादी अजित पवार(Ajit Pawar) गटाचा उमेदवार असल्याने पुन्हा एकदा महायुतीत आमनेसामने होण्याची शक्यता आहे. किशोर दराडे(Kishor darade) हे शिंदेंच्या सेनेचे उमेदवार असून राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे अॅंड.महेंद्र भावसार(Mahendra Bhavsar) हे उमेदवार आहेत आणि महायुती विरोधात ठाकरेंच्या सेनेचे संदीप गुळवे(Sandip gulve) हे मैदानात आहेत. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) हे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला माघार घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) विनंती करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे नाशिक मतदारसंघात निर्माण झालेला पेच आज मुख्यमंत्री सोडवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. महायुतीचे उमेदवार समोरासमोर लढल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभेप्रमाणे शिक्षक आणि पदवीधर मध्ये देखील ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत पहायला मिळणार आहे. पण यांच्यासोबत राष्ट्रवादीचा उमेदवार मैदानात असल्याने महायुतीतील दोन पक्षातील उमेदवार या निवडणुकीत रिंगणात असल्याने याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी देखील विजयासाठी कंबर कसली असून जोरदार आरोप प्रत्यारोपाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवारामुळे महायुतीला अधिक धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता आहे.

हे ही वाचा

सुदृढ नागरिक ही राज्याची संपत्ती, म्हणून…INTERNATIONAL YOGA दिनी CM Shinde यांचे आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss