Congress चा आरक्षणविरोधी चेहरा समोर, Rahul Gandhi यांच्या आरक्षणावरील वक्तव्यावरून CM Eknath Shinde यांची टीका

Congress चा आरक्षणविरोधी चेहरा समोर, Rahul Gandhi यांच्या आरक्षणावरील वक्तव्यावरून CM Eknath Shinde यांची टीका

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल. सध्या ती योग्य वेळ नाही,’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावर आता विरोधकांनी चांगलीच आगपाखड केली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीदेखील यावर आपल्याया प्रतिक्रिया देत, “आज काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आला आहे,” असे वक्तव्य केले आहे.

माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले,”विरोधी पक्षनेत्यांकडून याच्या पेक्षा काय अपेक्षा करू शकतो. कारण प्रत्येक वेळी विदेशात गेल्यावर आपल्या देशाची बदनामी करणे, देशातील जनतेची बदनामी करणे त्यांची भूमिका कायम राहिली आहे. काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा आज समोर आला आहे. पोटात जे असते ते ओठात आलेलं आहे त्यांनी ते बोलून दाखवल आहे, आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसची आहे. त्यांनी बाबासाहेबांना धोका दिला. बाबासाहेबांना काँग्रेसने दोनदा धोका देऊन पराभूत केलं जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात. बाबासाहेब नेहमी सांगायचे काँग्रेस हे जळकं घर आहे, बाबासाहेबांना जो काही अनुभव आला होता त्यातून ते विचार मांडत होते सांगत होते. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेल्या जे आरक्षण आहे. हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार आणि एनडीए सरकार राज्य सरकार केंद्र सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे,” असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “आरक्षण रद्द करण्याची हिंमत जो करेल त्या विरोधात केंद्र सरकार राज्य सरकार उभा राहील. ज्यांना आरक्षण मिळाला आहे त्यांना काँग्रेसचा खरा चेहरा कळला असेल. जगाला हेवा वाटावा असे भारताचं नावलौकिक जगामध्ये आहे. आपल्या भारताचे नाव पूर्ण जगभर रोशन करण्याचं काम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. इतर देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेले असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था अकराव्या नंबर वरून पाचव्या नंबर वर आणणं आणि आता तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प आहे. देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्याचा स्वप्न पाहणं हे एकीकडे आहे हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशभक्तीचे बात करत आहेत आणि दुसरीकडे देश विरोधी देशाचा अपमान करणारा वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे म्हणून मी त्यांचा निषेध करतो. संविधान विरोधी कोण हे यांच्या बोलण्यातून आज दिसलेला आहे. संविधानाला मानणारी जनता या देशातली सुज्ञ आहे येणाऱ्या काळात काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

PM Narendra Modi युक्रेनमध्ये जातात पण पेटलेल्या मणिपूरला भेट देत नाहीत: Sanjay Raut

नागपूर अपघातप्रकरणी Sushma Andhare पोचल्या नागपुरात, पोलीस स्टेशनमध्ये घुसून पोलीस अधिकाऱ्याला धरले धारेवर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version