मुख्यमंत्री एकनाथ शिंदे LIVE

अमित शहा, जे. पी नड्डा, रामनाथ कोविंद, राजनाथ सिंह यांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेतले, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ठ केले 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे LIVE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिल्ली: सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच दिल्ली गाठली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक वरिष्ठांची भेट घेतली. ही भेट विशेषतः वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट घेतली. आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट घेणार आहोत. या भेटीचा कुठलाच राजकीय अजेंडा नसल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. वरिष्ठांची सदिच्छा भेट घेण्यासाठी दिल्लीत आम्ही दाखल झालो. यावेळी अमित शहा, जे. पी नड्डा, रामनाथ कोविंद, राजनाथ सिंह यांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेतले, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ठ केले
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी, हे सरकार सर्व सामान्यांच्या हिताची जपणूक करणारं सरकार आहे असं म्हटलं. राज्याचा विकास करण्यासाठी दिल्लीची मदत आवश्यक असते. ज्या राज्याला केंद्राची मदत मिळते ते वेगाने विकास करतं. समृध्दी महामार्गाचे काम, मेट्रोचे काम आणखी वेगानं सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटपबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आषाढी एकादशी नंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत भेटून या संदर्भात एकत्र चर्चा करून आम्ही ठरवणार आहोत. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबद्दल ही एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रीया दिली,  हे सरकार बहुमताने निवडून आले आहे.
संजय राऊत यांच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर 
केंद्राकडून मुंबईचे तुकडे केले जाणार,  संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितले, अशी आम्ही कधी चर्चा ही ऐकली नाही त्यांनी लोकांची दिशाभूल करु नये. मुंबई ची जनता सुज्ञ आहे, त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळे उगाच दिशाभूल करु नये. असं ते म्हणाले. कुणाच्या बोलण्याने आमच्यावर काही परिणाम होणार नाही.
काही खासदार संपर्कात असल्याच्या चर्चांबाबत मुख्यमंत्री म्हणाले, रोज कामानिमित्त माझ्या संपर्कात अनेक जणं येत असतात. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर अधिक बोलणं टाळलं.
Exit mobile version