Saturday, July 6, 2024

Latest Posts

“काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे” ; CM Eknath shinde यांची विरोधकांवर सडकून टीका

सगळ्याचं सरकार आहे. देश आणि राज्याला आघाडीवर घेऊन जायचं आहे. २२१ सिंचन प्रकल्पाच्या योजना सरकारमध्ये काढल्या. कॅबिनेट मध्ये योग्य त्या चर्चा करुन निर्णय घेऊ. सामान्य माणूस ते मुख्यमंत्री असा बदल झाला पण यामध्ये माझ्यामध्ये काही बदल झालेला नाही."असं ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) त्यावेळी म्हणाले. 

विधानसभेच्या पार्श्वभुमीवर सर्वपक्षीयांची तयारी सुरुच आहे. आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे विवेक विचार मंच आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचं आयोजन करण्यात आले होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी या परिषदेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत टीका करत म्हणाले की,”मोदी हटाव बोलणारे स्वत:हटले पण मोदी हटले नाहीत. लोक खोटं नरेटिव्ह पसरवत आहे.आता गाफिल राहू नका.”असं म्हणत त्यांनी सुरुवात केली. 

“लोकसभा निवडणुकीनंतर लोकांनी खोट्या बातम्या पसरवल्या. खोटं नरेटिव्ह सेट केलं. घटना बदलणार अशी भिती पसरवली. मोदी हटाव च्या घोषणा केल्या पण मोदी हटानेवाले हट गये और मोदी बैठ गये.ज्या लोकांनी खोटं नरेटीव्ह सेट करुन खोटं पसरवलं त्यांना आता जागृक होऊन उत्तर दिलं पाहिजे.”अशा शब्दात विरोधकांवर निशाणा साधला.

पुढे ते म्हणाले,”बाबासाहेबांनी कॉंग्रेसने २ वेळा पाडलं. बाबासाहेबांचा पराभव केला आणि ते म्हणाले होते की, कॉंग्रेस हे जळक घर आहे त्यांच्यापासून लांब रहा. जोपर्यंत सूर्य, चंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान बदलणार नाही.”असं म्हणत त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली.तर, आमचे पाशा पटेल हे बांबूची लागवड करतात. बांबू हा ऑक्सिजन देणारा आहे. काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे. सकाळ सकाळ भोंगा वाजतो. एक भोंगा निघाला तर दुसरा भोंगा चालू आहे अशा शब्दात संजय राऊत(Sanjay Raut) यांचं नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांनी टीका केली.

“मुंबईत आम्ही जे २ वर्षात काम केलं आहे.अटलसेतू, समृद्धी महामार्ग, रस्त्याचं जाळं फेकतं आहे. शिवरायांनी स्वराज्य दिलं, फुलेंनी शिक्षण दिले,शाहु महाराजांनी आरक्षण दिलं, आंबेडकरांनी संविधान दिलं. हे सगळं आपल्याला जपलं पाहिजे. ५ लाखांचा विमा पंढरपूर मध्ये वारकऱ्यांसाठी काढून दिला आहे. प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याचं काम सुरु केलं आहे. २०१५ ला संविधान दिन साजरा करुन बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवण करुन दिली. त्यामुळे जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब की तरह काम रहेगा.मोदींनी जसं आत्मनिर्भर केलं तर आईला सन्मान देण्याचं काम केलं. सगळ्याचं सरकार आहे. देश आणि राज्याला आघाडीवर घेऊन जायचं आहे. २२१ सिंचन प्रकल्पाच्या योजना सरकारमध्ये काढल्या. कॅबिनेट मध्ये योग्य त्या चर्चा करुन निर्णय घेऊ. सामान्य माणूस ते मुख्यमंत्री असा बदल झाला पण यामध्ये माझ्यामध्ये काही बदल झालेला नाही.”असं ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) त्यावेळी म्हणाले. 

हे ही वाचा

सुदृढ नागरिक ही राज्याची संपत्ती, म्हणून…INTERNATIONAL YOGA दिनी CM Shinde यांचे आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss