मुख्यमंत्री शिंदेंचा शिवसेनेला टोला म्हणले, सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का?

मुख्यमंत्री शिंदेंचा शिवसेनेला टोला म्हणले, सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर असून आज मुक्ताईनगर येथे जाहीर सभा झाली. यासभेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी पक्षावर प्रहार केला. यावेळी ते म्हणाले, जळगावात गुलाबराव पाटलाचे प्रस्थ आहे. मात्र गुलाबराव पाटलांना हिणवले जाते. कुणीही हिणवण्याचे काम करू नये. मी स्वत शेतकऱ्याचा मुलगा आहे, मात्र मुख्यमंत्री झाल्यावर ते चालत नाही. तसेच सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा सवाल उपस्थितांना करत मुख्यमंत्र्यांनी खोचक टीका देखील केली.

राजकारणात चालत आलेल्या घराणेशाहीबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना दरवेळी पानटपरीवाला म्हणून हिणवण्यात येते. कुणाला हिणवणे चुकीचे आहे. कुणीही शून्यातून येऊन नवनिर्मिती करत असतो. मी शेतकऱ्याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झाला, पण हे विरोधकांना चालत नाही.मात्र जनेतेने आम्हाला स्वीकारल आहे.

 

जळगाव दौऱ्यदरम्यान झालेल्या या सभेमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले कि, शिवसेनेत असताना आम्ही उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी पक्ष संपवीत आहे, हे वारंवार सांगत होतो. त्यावेळी गुलाबराव पाटील देखील म्हणत होते, त्यांना सांगा राष्ट्रवादी आपल्याला संपवीत आहे. मी स्वतः त्यांना पाच वेळा सांगितले, कि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेलो ती चूक सुधारवा पण ऐकले नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि मोदीचा फोटो लावला आणि निवडणूक जिंकलो. शिवसेनेतून बाहेर पडत आम्ही बरोबर केले. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार? आम्ही चूक सुधरवली मग गद्दार कोण? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला. आमदार खासदार यांची काम होत नव्हती, आता ती दोन महिन्यात केली. विरोधी पक्ष आता घाबरला असून एकनाथ शिंदे गणपती मंडळ फिरतो, घराघरात जातो. त्यामुळे ते फिरत आहेत. आता त्यांनी अर्धे पुण्य मला द्यायला हवे. तर काहीजण दोन मुख्यमंत्री ठेवण्याचे सांगतात.मात्र त्यांना आधीचा अनुभव असल्याने ते असे म्हणत असल्याचा खोचक टोलाही मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना लगावला.

यावेळी राष्ट्रवादीवर टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्हाला राष्ट्रवादीच्या लोकांना सांगायचे आहे, आम्ही निवडणूक बघून काम करत नाही. गुलाबराव पाटील यांनी २२ हजार पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. आज आम्ही १७० आहोत. आता फक्त ३० चा आकडा वाढवायचा आहे, त्यामुळे २०० च्या पुढे गेलो तरी आश्चर्य वाटायला नको, हे ग्रामपंचायत निवडणुकीवरून सिद्ध होते असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आम्ही पुढे नेतोय, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

वयाच्या 48 व्या वर्षी मलायकाचा ग्ल्यामर्स हटके लुक

Spam call : जर तुम्हाला मोबाईलवर अनोळखी कॉल्स त्रास देत असतील, तर तुम्ही या स्टेप्स वापरून ब्लॉक करू शकता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version