मुख्यमंत्रिपदासाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते; CM Eknath Shinde यांचा Uddhav Thacakeray यांच्यावर निशाणा

मुख्यमंत्रिपदासाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते; CM Eknath Shinde यांचा Uddhav Thacakeray यांच्यावर निशाणा

राज्यात आगामी विधानाहा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) सर्वच पक्ष मैदानात उतरल्याचे दिसत आहे. यंदा महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) थेट लढत होणार असून जागावाटपावरून दोन्ही आघाड्यांमध्ये रस्सीखेच चालू असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीमध्ये मात्र मुख्यमंत्रीपदावरून काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला (NCP Sharad Pawar) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने निवडणुका झाल्यावर ज्याच्या जास्त जागा त्याला मुख्यमंत्रीपद अशी भूमिका घेतली आहे. यावरून राज्यात राजकीय चर्चा चालू असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून ठाकरे गटावर जोरदार आगपाखड केली. “मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते,” अश्या खोचक शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या ट्विटर पोस्टमुळे आता नवा वाद निर्माण झाला असून त्यावर आता इतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटर पोस्ट करत म्हंटले कि, “काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झालं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते. वसुली प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेल्या आणि शेतकऱ्यांची बँक गिळली म्हणून न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या लोकांच्या बाजूला बसून भ्रष्टाचाराबद्दल बाता करण्यासारखा कोडगेपणा नाही. लोकांना काहीच देऊ शकणार नाहीत, असे त्यांनी कबूल करून टाकले ते बरे केले. कुणालाच काही देण्याचे यांना माहीतच नाही. यांना फक्त घेणे माहीत आहे. यांच्याकडे दानत नाहीच. आमच्या लाडक्या बहिणींना दिलेले पंधराशे रुपयेही तुमच्या डोळ्याला टोचतात. बहिणीला ओवाळणी देण्याची संस्कृतीही यांना मान्य नाही? त्यामुळेच आता मिळतात अगदी तेवढे पैसेही बहिणींना देणार नाही, असे हे सांगतात. त्यांची महिला वर्गाबद्दलची आस्थाही यांच्या हिंदुत्वासारखीच बेगडी आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “कोविड रुग्णांच्या तोंडची खिचडी खाणाऱ्या, बॉडी बॅगमधूनही कमिशन ओरपणाऱ्या लोकांनी भ्रष्टाचार हा शब्द बोलण्याची हिंमत करावी? राज्यातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा पाठिंबा आणि सढळ हस्ताने होणाऱ्या मदतीला भीक म्हणून संबोधत हेटाळणी करणारे, विरोध करणारेच खरे महाराष्ट्रद्वेष्टे आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली, पण पैसे आमच्या सरकारने दिले, हे ध्यानात ठेवा.”

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोलण्याची आपली पात्रता आहे का हे जरा काही जणांनी आरशात बघावे. बाळासाहेबांनी राजकारण व हिंदुत्वाची गल्लत केली, असे बोलणाऱ्यांना त्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरला आहे का? हिंदुत्व हा शब्द आता त्यांच्या तोंडात शोभतच नाही. निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा तर करूच नये. अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. महाराष्ट्र हा कणखर, रांगड्या, राकट लोकांचा देश आहे. इथे असे “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली” म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत. या घरबशांना लोक पुन्हा कायमचे घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपचे हिंदुत्व मान्य आहे का, असा प्रश्न नागपूरमध्ये सरसंघचालकांना विचारला गेला. तुम्ही तुमच्या शिवसेनेचेच हिंदुत्व बासनात बांधले… ते आधी लोकांसमोर कबूल करा,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

‘मुंबईत हायअलर्ट’? दहशतवादी मोठ्या हल्ल्याची भीती, पोलीस ऍक्शन मोडवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version