CM एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याच्या पोस्टरनंतर, टीझरची झलक आली समोर

CM एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याच्या पोस्टरनंतर, टीझरची झलक आली समोर

दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटात वाद सुरू आहे. दसरा मेळावा आम्हीच घेणार असा दावा दोन्ही बाजूने करण्यात आला. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर हा मेळावा व्हावा यासाठी दोन्ही गटांनी बीएमसीकडे परवानगी मागितली. परंतु बीएमसीने कायदा-सुव्यवस्थेचं कारण सांगत परवानगी नाकारली. त्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून हायकोर्टात याचिका करण्यात आली. त्यात हायकोर्टाने ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास ग्रीन सिग्नल दिला. तर आता शिंदे गटाकडे बीकेसी मैदानाशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता शिंदे-ठाकरे गटात मेळाव्याच्या गर्दीवरून रणनीती आखण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणजे आज शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर प्रसारित करण्यात आले आहे. त्याच पाठोपाठ आता एका टीझरची झलक समोर येत आहे.

विक्रम वेधा रिलीज होण्यापूर्वी सैफने मांडले आपले विचार म्हणाला ‘ मी जरा डाव्या विचारसरणीचा…

हेही वाचा :  

‘एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो’ उदय सामंतांचे व्यक्तव्य

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांना जनतेला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे वेध लागले आहेत. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. त्याच दोन्ही गटांकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे. या सर्वांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याचे पोस्टर समोर आले होते आता शिंदेंनी त्यांच्या बिकेसी मैदानावर होणार असलेल्या दसरा मेळाव्याचा टीझर देखील शेअर केला आहे.

‘भगवा झेंडा हातात नसून हृदयात असावा’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Exit mobile version