शरद पवारांच्या मध्यरात्री भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच स्पष्टीकरण

प्रसारमाध्यमांवर शरद पवार आणि एकनाथ शिंदे मध्य रात्री भेटल्याचा बातम्या प्रसारित करण्यात आल्या त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

शरद पवारांच्या मध्यरात्री भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच स्पष्टीकरण

शरद पवारांच्या मध्यरात्री भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच स्पष्टीकरण

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना (Eknath Shinde and Sharad Pawar Meeting) भेटल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केलं आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1544565626370306048?t=7Iot9wQ7cFDZP31StPtO7w&s=19
अनेक प्रसारमाध्यमांवर शरद पवार आणि एकनाथ शिंदे मध्य रात्री भेटल्याचा बातम्या प्रसारित करण्यात आल्या त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. परंतू राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वित करत या अफवा असल्याचं म्हटलं आहे. या ट्विट मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये….. असंमा.श्री.शरद मुख्यमंत्र्यांनी ट्विट मध्ये सांगितलं.
मागील अनेक दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत.  विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठं बंड झालं. एकनाथ शिंदेंपाठोपाठ तब्बल ४० आमदार आणि मंत्री नॉटरीचेबल झाल्याने. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. महाविकास आघाडी सरकार कोसळून त्याजागी लगेच शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झालं.
Exit mobile version