spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

CM Shinde on MVA Jode Maro Andolan: MVA च्या सरकारमध्ये लेकीबाळी सुरक्षित होत्या का? CM Shinde विरोधकांवर संतापले, महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात…

मालवण येथील राजकोट (Rajkot) या ठिकाणच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Chhatarpati Shivaji Maharaj Statue Collapse) राज्यातील महायुती सरकारविरुद्ध (Mahayuti Government) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज १ सप्टेंबर रोजी “जोडे मारो आंदोलन” (Jode Maro Andolan) पार पडत आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) पर्यंत या मोर्चाचा मार्ग ठरवण्यात आला आहे. या मोर्चाबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांवर आरोपांची तोफ डागली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

विरोधक दंगलीची भाषा करत होते. विरोधकांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यांना महाराष्ट्रात शांतता नाही पाहिजे. महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात असंच त्यांना वाटतंय. जाती-जातीत तेढ निर्माण व्हावा असा प्रयत्न त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीही केला होता. पण राज्यातील जनता संयमी आहे तसेच सूज्ञ आहे, म्हणून राज्य सरकारसुद्धा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करत असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केलं आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लेकीबाळी सुरक्षित होत्या का? नवनीत राणांना जेलमध्ये टाकलं. कंगना राणावतचं घर तोडलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये किती महिलांवर अन्याय करण्यात आला? यांना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा किती अधिकार पोहोचतो माहीत नाही पण महाराजांच्या नावाने राजकारण करू नये, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीबाबत बोलताना केला.

जोडे मारो आंदोलनात कोणाचा सहभाग?

या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीमधील इतर प्रमुख नेत्यांचा सहभाग आहे. या आंदोलनासाठी मुंबईसह राज्यातील इतर भागांमधून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत.

महायुती (Mahayuti) कडूनही आंदोलनाची हाक

आज हुतात्मा चौक (Hutatma Chowk) ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती मात्र तरीही मविआकडून हे आंदोलन करण्यात आले. याशिवाय मविआच्या आंदोलनाला महायुतीने आंदोलनातूनच उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) च्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss