उर्फी जावेदच्या तक्रारीनंतर महिला आयोगाचे पोलिस आयुक्तांना आदेश

उर्फी जावेदच्या तक्रारीनंतर महिला आयोगाचे पोलिस आयुक्तांना आदेश

सध्या उर्फी जावेद आणि चित्र वाघ प्रकरण चांगलंच पेटल्याचं दिसून येत आहे. मॉडेल, अभिनेत्री उर्फी जावेद (Model, Actress Urfi Javed) ही तिच्या अनोख्या फॅशन (Unique fashion) सोबतच तिच्या अनोख्या ट्विट्स (Unique tweets) मुळे देखील चर्चेत असते. तिच्या याच अनोख्या फॅशनमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी उर्फीवर सार्वजनिक ठिकाणी (in public places) अश्लीलता (Obscenity) पसरवत असल्याचा आरोप (Accusation) केला होता. विचित्र कपड्यांवरून प्रसिद्धीस आलेली उर्फी जावेद (Urfi Javed) हिने आपल्या जीवितास धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. माझ्यावर कधीही जीवघेणा हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता उर्फी जावेदने व्यक्त केली आहे. महिला आयोगानेदेखील उर्फी जावेदच्या तक्रारीची त्वरीत दखल घेतली आहे.

विचित्र कपड्यांवरून प्रसिद्धीस आलेली उर्फी जावेद (Urfi Javed) हिने आपल्या जीवितास धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. महिला आयोगाकडे (Women Commission) उर्फी जावेदने यांसदर्भात तक्रार दाखल केली आहे. राजकीय स्वार्थापोटी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मला मारहाणीच्या धमक्या दिल्या आहेत. या प्रकरणी महिला आयोगाने आता थेट मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. महिाल आयोगाच्या अध्यक्षा रुपाली पाटील चाकणकर यांनी उर्फी जावेदच्या तक्रारीनंतर पोलीस आयुक्तांना हे पत्र लिहिलंय. सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी आणि त्याचा अहवाल महिला आयोगाला पाठवण्यात यावा, असे आदेश महिला आयोगाने दिले आहेत.

भारतीय राज्य घटनेने प्रत्येक भारतीयाला मुक्त संचाराचा हक्क दिला आहे. पण महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा. अशा सूचना राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिली आहे.

हे ही वाचा:

नितीन देशमुख निघाले ACB कार्यालयाकडे, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानचे अब्दुल रहमान मक्की यांना जागतिक दहशतवादी म्हणून केले घोषित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version