विकास काम ठरवून दिल्याप्रमाणे झाली नसल्याची तक्रार, बच्चू कडू संतापले आणि त्यांनी ……

विकास काम ठरवून दिल्याप्रमाणे झाली नसल्याची तक्रार, बच्चू कडू संतापले आणि त्यांनी ……

महाविकास आघाडी मध्ये मंत्री असलेले बचू कडू हे शिंदे गटात शामिल झाले. आपल्या कामा मुळे आणि शेतकऱ्यांच्या न्याया साठी धावणारे म्हणून बचू कडू यांची अमरावतीमध्ये ओळख आहे. आज बच्चू कडू यांनी विकास कामाबद्दल विचारणा केल्याचा राग मनावर होत आपल्या सर्कल प्रमुखाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर तुफान व्हायरल होत आहे.

आज सकाळच्या सुमारास अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या सर्कल प्रमुखाच्या कानशिलात लावल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. बच्चू कडू यांच्या मतदार संघातील गणोजा येथील सर्कल प्रमुख पदावर काम करणारे सौरभ इंगोले यांनी विकास काम ठरवून दिल्याप्रमाणे झाली नसल्याची तक्रार केली. बच्चू कडू यांनी त्याला “तुला काय समजत”, असं म्हणत संतापले आणि त्यांनी त्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. सूत्रांच्या माहितीनुसार सौरभ इंगोले हा अनेक दिवसांपासून बच्चू कडू यांच्यासोबत काम करत आहे दरम्यान सौरभ इंगोले यांची पत्नी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत आहेत बच्चू कडू यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकाच खळबळ निर्माण झाली आहे.

राज्यातील सत्ता संघर्ष दरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत मार्गे गुहागाटी जात राज्यात सत्तांतर घडवून आणले त्यानंतर बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती. मात्र, त्यांना राज्यमंत्री पदवी न मिळाल्याने त्यांची अस्वस्थता समाज माध्यमांपासून तर सभा संमेलनापर्यंत चर्चेचा विषय बनली होती. अमरावती येथील महेश भाऊंना झालेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गिरीश गांधी यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना हा संयमाचा काळ असून या काळात शांततेने व सौजन्याने वागा असा सल्लाही दिला होता.

हे ही वाचा:

PFIवरील बंदीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, मोठा खुलासा करत म्हणाले…

पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांवर कठोर करावाई … – एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version