शिवसेना-भाजपच्या परस्परविरोधी घोषणांनी ठाणे परिसर दणाणला

या दोन्ही विरोधी पक्षांचे कार्यक्रम एकाचवेळी एकाच ठिकाणी आयोजित करण्यात आल्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजीची जुंगलबंदी सुरु होती.

शिवसेना-भाजपच्या परस्परविरोधी घोषणांनी ठाणे परिसर दणाणला

एका बाजूला ‘देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, अशा घोषणा तर दुसऱ्या बाजूला ‘ईडी सरकार हाय हाय, आणि 50 खोके एकदम ओके, अशा घोषणांनी आज ठाणे परिसर दणाणून गेला होता. याचे कारण म्हणजे आज ठाणे (Thane) स्थानकाबाहेर फॉक्सकॉन कंपनी गुजरातला गेल्याने निषेध व्यक्त करण्यासाठी शिंदे सरकार विरोधात स्वाक्षरी मोहीम उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे शिवसेना (Shiv Sena) जिल्हाध्यक्ष केदार दिघे आयोजित केली होती. तर त्याच्या बाजूलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे भाजप (BJP) पदाधिकारी सारंग मेढेकर यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते तर मोदी यांच्या गौरवार्थ महिला अध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी आज ठाण्यात बॅनर देखील लावला होता. या दोन्ही विरोधी पक्षांचे कार्यक्रम एकाचवेळी एकाच ठिकाणी आयोजित करण्यात आल्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजीची जुंगलबंदी सुरु होती.

उद्धव ठाकरे गटाकडून खासदार राजन विचारे यांनी स्वाक्षरी मोहीमेला हजेरी लावून सध्याचे सरकार आणि भाजपवर जबरदस्त टीका केली. तर रक्तदान शिबिर आणि बॅनरच्या उद्घाटनासाठी भाजप नेते कृपाशंकर सिंह आणि आमदार निरंजन डावखरे आले होते. त्यांनी देखील, उद्धाव ठाकरे गटाला अशी घोषणाबाजी करण्यावाचून काहीही काम उरले नाही, अशी टीका केली. मात्र काही काळासाठी दोन्ही बाजूने तुफान घोषणाबाजी केली गेली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटांना आवरले. काही काळाने वातावरण थंड झाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. या निम्मिताने आज देशभरात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

मोदी ओबीसी नाहीत, नाना पटोलेंचं वक्तव

राज ठाकरे चार दिवसीय दौऱ्यासाठी निघाले एक्सप्रेसने

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version