खा. सुप्रिया सुळे यांच्या बारामती दौऱ्यात गावकऱ्यांचा राडा, दोन गट आमने-सामने

खा. सुप्रिया सुळे यांच्या बारामती दौऱ्यात गावकऱ्यांचा राडा, दोन गट आमने-सामने

राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. तालुक्यातील विविध गावांना आज भेटी देऊन सुप्रिया सुळे या त्याभागातील आढावा घेत आहेत. दरम्यान तालुक्यातील एका गावात खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरू असताना चक्क सुळे यांच्यासमोरच गावकरी आपापसात भिडल्याची दिसून आले. सुळे यांनी आपल्या कुटुंबातील उदाहरण देत, यावेळी वादावर पडदा टाकला.

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावातून जेजुरी ते नीरा नरसिंहपूर या राज्यमार्गाचे काम सुरु आहे. या ठिकाणी दहा मीटर रुंदीकरण प्रस्तावित असून यामध्ये ग्रामस्थांमध्ये वाद आहेत. सदरचा रस्ता सात मीटरचा करण्यात यावा, असं एका गटाचं मत आहे तर दुसऱ्या गटाने दहा मीटरचा रस्ता व्हावा अशी मागणी केली. त्यामुळे या वादाला आणखी तोंड फुटले.

हेही वाचा : 

मनमोहन सिंघ यांना वाढदिवसानिमित्त बड्या नेत्यांनी दिल्या शुभेच्या,जाणून घ्या माजी पंतप्रधान विषयी माहिती

गावातील रस्त्याच्या कारणावरून गावकऱ्यांच्या दोन गटात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. चांगल्या कामासाठी आपापसात तुम्ही भांडलात ही चांगली गोष्ट आहे. तुमचं कोणी ऐकत नसेल तर अकांड तांडव करणे योग्य आहे. मात्र आम्ही ऐकायला तयार असताना असा वाद करणे योग्य नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी गावकऱ्यांचे कान टोचले.

विरोधी पक्षनेते अजित पवार, मी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एकत्र बसून यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. यानंतर गोंधळ शांत झाला. दरम्यान याविषयीचा गोंधळ सुमारे अर्धा तास सुरु होता. मात्र सुप्रिया सुळे यांनी एका एका ग्रामस्थांची बाजू समजून घेतली आणि त्यानंतर सर्वांना समजून सांगितले.

राजस्थानमधील सत्तासंघर्षावर गुलाम नबी आझादांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘राजकारण गरीब माणसांमध्ये आणू नका’ सुप्रिया सुळेंची मागणी

महाविकास आघाडीच्या काळात सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी बंद होण्याची शक्यता आहे. शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे. त्यावर सुप्रिया सुळे मात्र संतापल्या. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना राजकारणच दिसतं. गरीब कष्टकरी लोकांसाठी ज्या योजना केल्या आहेत त्या कृपा करुन बंद करु नका. राजकारण गरीब माणसांमध्ये आणू नका अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव तापाने फणफणला होता, व्हिडीओ झाला व्हायरल

Exit mobile version