spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Congress च्या जागा आमच्यामुळे वाढल्या, Sanjay Raut यांचा मोठा दावा

आगामी महाराष्ट्र्र विधानसभा निवडणुका (maharashtra Asembly Election 2024) तोंडावर आल्या असताना आता महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपावरून आता वाटाघाटी चालू झाल्या आहेत. कोणत्या पक्षाला किती जगा मिळणार यांचे चर्चासत्र आणि बैठकांच्या धडाक्याला आता सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीमध्येही काँग्रेस (Congress), शिवसेना उबाठा पक्ष (Shivsena UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (NCP Sharad Pawar) यांच्यामध्येही आत्मविश्वास दुणावला असून आता जागावाटपावरून रस्सीखेच होत असल्याचे पुढे येत आहे. अश्यातच आता शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाविकास आघाडीमधील घटकपक्ष काँग्रेसवर मोठे भाष्य केले असून काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या असा दावा केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चाना सुरुवात झाली आहे.

संजय राऊत यांनी आज (शुक्रवार, २० सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मविआमधील जागावाटपाच्या चर्चांबाबत भाष्य केले. “कोल्हापूरची जिंकलेली जागा तसेच रामटेक, अमरावतीची जागा त्यांना आम्ही दिली, हे जर ते विसरत असतील तर ते योग्य नाही,” असे म्हणत त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्यात: संजय राऊत

याववेली बोलताना संजय राऊत म्हणाले,”काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्यात. सर्व लहान मित्र पक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील. तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधा-यांच्या फायद्यासाठी असते, कारण ती विरोधकांची मत फोडते महाविकास आघाडीची आज जागा वाटप बैठक होतेय. कोल्हापूरची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली. रामटेक, अमरावतीची जागा त्यांना आम्ही दिली. हे जर ते विसरत असतील तर ते योग्य नाही. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा प्रकारच्या भूमिका घेणार नाहीत. आत्मविश्वास सर्वांचाच वाढलेला आहे. तीनही पक्षांना एकत्र राहावं लागेल त्यासाठी ते एकटे राहणार नाहीत. महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास वाढणार नाही. जर तो आत्मविश्वास वाढला तर अभ्यासाचा विषय आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “लोकसभेचे जागावाटप सोपे होते. सर्वांना सामावून घेण्याची आमची भूमिका आहे. मित्र पक्षाला सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत आणि ते नक्कीच करू. तिसरी आघाडी सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनविलेले असते. जे केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असतात त्यांच्यासाठी काही विषय अडचणीचे असतात तर तिसरी आघाडी उभी केली जाते विरोधकांमध्ये मतांची दुखणे वाजवण्यासाठी ही तिसरी आघाडी बनवली जाते. महाविकास आघाडीचे मत कमी करण्यासाठी काही नवीन आघाडी उभी केली जाते आहे. पैशाचा वापर केला जातोय पदांचा वापर केला जातो असं मला वाटतं. महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहेत. परंतु कुठला गोंधळ नाही,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच; पितृ पंधरवड्यातही Mahayuti – Mahavikas Aaghadiच्या बैठकांना जोर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss