spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

काँग्रेसची तांबेंवर कारवाई, सुधीर तांबें पक्षातून निलंबित

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पदवीधर निवडणुकीची तयारी जोरदार सुरु झाली आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत धक्कादायक ट्विस्ट आला आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, त्यानंत त्यांचे सुपूत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला (Maharashtra Political News). सत्यजित तांबे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलेय. नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन आता राजकारण चांगलंच तापल्याच दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई केली असल्याचं पत्र जारी करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबित असणार आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी (Nashik Graduate Constituency) सुधीर तांबे यांची अधिकृत घोषणा झाल्यानंतरही त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हाय कमांडला दिली होती. तसेच कारवाईचीही मागणी केली होती. यावरुन हायकमांडनं सुधीर तांबेंना निलंबित केलं आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अखेर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. त्यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म (AB form) जोडला नसल्याने त्यांची उमेदवारी अपक्ष जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे आज राबवण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेत भाजपच्या चार उमेदवारांनी अर्ज भरूनही त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, हे समोर आलंय. त्यामुळे या खेळीमागे भाजपची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा सध्या नगर जिल्ह्यात रंगली आहे.

हे ही वाचा:

शुभम गिलच्या पाठोपाठ विराट कोहलीने ठोकले शतक

Collage Festival, ‘अंतरंग’ फेस्टिवलमध्ये रंगले कीर्ती कॉलेजचे विद्यार्थी

Nepal Yeti Airlines Plane Crash, लँडिंगच्या अवघ्या १० सेकंदापूर्वीच प्लेन झाले क्रॅश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss