गांधींच्या हत्येमागे काँग्रेस, रणजित सावरकरांचा काँग्रेसवर थेट आरोप

गांधींच्या हत्येमागे काँग्रेस, रणजित सावरकरांचा काँग्रेसवर थेट आरोप

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले. त्या यात्रेस वीर सावरकरांवरील नाहक टीकेने गालबोट लागले. यानंतर भारतीय जनता पक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात रस्त्यावर उतरला. भाजप कडून काँग्रेस विरोधात अनेक आंदोलन झाली. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी सुद्धा या वादात उडी मारली आहे.रणजित सावरकर यांनी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. आता रणजित सावरकर यांनी महात्मा गांधींच्या हत्येमागे काँग्रेसचाच हात आहे असे विधान करत काँग्रेसवर थेट आरोप केला आहे.

रणजित सावरकर यांनी काही पुस्तकांचा उल्लेख करत हे विधान केलं आहे. त्यात रणजित सावरकरांनी पु. ल इनामदार यांनी त्यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. रणजित सावरकरांनी सांगितले की गांधींच्या हत्ये शामिल असलेला आरोपी जगदीश गोयल आणि गंगाधर दंडवतेंनी या दोघांनी नथुराम गोडसेंना पिस्टल सोपवली होती. सावरकरांनी सांगितलं की जगदीश गोयल याने पोलिसांना जबाब दिला होता की त्याला पिस्टल नाथिलाल जैन नावाच्या माणसाने दिलं. तर या प्रकरणात पोलिसांनी डॉ परचुरे याना अडकवले डॉ परचुरे ज्यांच्यावर आरोप होता की, गंगाधर दंडवतेंनी पिस्तुल घेतलं आणि मग ते नथुराम गोडसेला दिलं.पण जगदीश गोयल याला पोलिसांनी न्यायालयात हजरच केलं नव्हतं . रणजित सावरकर यांनी परचुरे यांचे वकील पु. ल इनामदार यांनी त्यांच्या पुस्तकाचा उल्लेख करत सांगितलं की इनामदा यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की “नाथिलाल जैन हा ग्वाल्हेरच्या काँग्रेस मंत्र्यांचा मेव्हणा होता. नाथिलाल जैननं हे पिस्तुल कुठुन आणलं. कारण हे पिस्तुल इटालियन आर्मी इशू आहे. इटालियन आर्मी इशू आलं कुठुन? मला खात्री आहे की पोलिसांकडे या जबान्या असणार आहेत. मात्र या प्रकरणाचे थेट धागेदोरे काँग्रेसपर्यंत पोहोचत होते, म्हणून नाथिलाल जैनला कोर्टात हजरच केलं नाही. वकील इमानदारांनी कोर्टात बाजू मांडताना आरोप केला आहे की, पोलिस हे जाणीवपूर्वक करताहेत. ते एक पोकळी ठेवत आहेत, गोंधळ निर्माण करण्याकरता. ही पोकळी पुढे तशीच राहिली.”अस रणजित सावरकरांनी सांगितलं.

रणजित सावरकरांनी सांगितलं की आजवर याच उत्तर काही मिळालेलं नाही पोलिस रेकॉर्डमध्ये हे सगळं दफन झालं आहे,असा आरोप रणजित सावरकर यांनी केला. तसेच त्यांनी गांधींवर अनेक आरोप देखील केले आहेत. कारण महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप हा खूप मोठा वादग्रस्त विषय आहे.त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

धूम्रपान न करणाऱ्यांनाही फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, कमी करा रिस्क

Exit mobile version